How to deal with people who do not value you : अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. यामुळे आपण स्वतःला खूप हुशार व इतरांना कमी समजू नये. तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा अनुभव घेतला असेल किंवा तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटली असेल जी स्वतःला जास्त महत्त्व देते आणि तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. साहजिकच, असे वर्तन कोणालाच आवडत नाही आणि त्यामुळे न्यूनगंडही निर्माण होतो. अशावेळी स्वतःला कमी समजू नका. त्याऐवजी तुमच्या वागण्या-बोलण्यात काही चांगले बदल करा. चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या पाच सवयी अंगीकारल्या, तर जे लोक आज तुम्हाला महत्त्व देत नाहीत, तेही तुमचा आदर करतील आणि स्वतःहून तुमच्याशी बोलण्यास उत्सुक होतील.
जास्त उपलब्ध राहू नका
नेहमीच इतरांसाठी उपलब्ध राहण्याची सवय टाळा. इतरांच्या कामे करण्यात वेळ घालवण्याऐवजी, स्वतःच्या कामावर, ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कमला प्राधान्य देता. तेव्हा लोक तुमच्या वेळेची व उपस्थितीची किंमत ओळखू लागतात. कारण – काही कामे अशी असतात, जी तुमच्याइतकी चांगली दुसरे कोणी करू शकत नाही.”
कमी बोला
शांत राहणे कठीण असले तरीही ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. कमी बोलून जास्त काम करू शकतात तेच जीवनात यशस्वी होऊ शकतात. जेव्हा तुम्ही शांत राहून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कररतात तेव्हा आपोआपच इतर मंडळी तुमचा आवाज, तुमचे मत ऐकण्यासाठी उत्सुक असतात.
सगळ्यांना सगळं सांगू नये
अनेकांना आपल्या अडचणी, दुःख किंवा कमतरता सतत इतरांना सांगण्याची सवय असते. त्यांना वाटते की, यामुळे लोक सहानुभूती दाखवतील. पण, अनेकदा याचा उलट परिणाम होतो. तुमच्या कमजोरीची माहिती मिळाल्यानंतर काही लोक त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर मांडण्याऐवजी योग्य व्यक्तीशी आणि योग्य वेळीच ती शेअर करणे अधिक शहाणपणाचे ठरते.
इतरांचा पाठलाग करू नका
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्याकडे किंवा तुमच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. तेव्हा त्या व्यक्तीला जास्त महत्त्व देऊ नका. एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा जितका तुम्ही जास्त पाठलाग करणार तितकेच तो तुमच्यापासून दूर जाईल. म्हणून, स्वतःचे मूल्य ओळखायला शिका.
गोष्टी मर्यादित ठेवा
गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवाव्यात किंवा त्या फक्त अशा लोकांसोबत शेअर कराव्यात जे तुम्हाला समजून घेऊ शकतात. तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, ते दुसऱ्या व्यक्तीसाठी तितकेच महत्त्वाचे असेलच असे नाही. त्यामुळे गोष्टी मर्यादित ठेवा. जर तुम्ही चाणक्य नीतीमधील हे पाच मुद्दे लक्षात ठेवले, तर लोकांमध्ये तुमचे मूल्य वाढेल.
