Chanakya Niti Warns Against These 5 Habits : आचार्य चाणक्य एक महान तत्त्वज्ञ आणि सल्लागार होते. त्यांची गणना देशातील महान विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी ‘चाणक्य नीती’ नावाचा ग्रंथ रचला. या ग्रंथात मानवी जीवनाच्या अनेक पैलूंवर चर्चा केली आहे, ज्याचा अभ्यास केल्याने योग्य मार्गदर्शन मिळते. त्यामुळे चाणक्यांची नीती केवळ भारतातच नव्हे, तर जगभर प्रसिद्ध आहे. आजही प्रतिकूल परिस्थितीत या धोरणांचे पालन केले जाते. कारण – त्यांच्या सल्ल्याने अत्यंत कठीण समस्याही सहजपणे सोडवण्यास मदत होते. याशिवाय, चाणक्य नीतीमध्ये माणसाच्या अशा सवयींवरही चर्चा केली आहे, ज्या सतत तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण करू शकतात.

चुकांची पुनरावृत्ती

काही मंडळी परिणाम काय येणार हे माहिती असूनही चुकांची पुनरावृत्ती करतात ते नेहमीच अडचणीत येतात. वारंवार चुका करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे व्यक्तीचा प्रभावही कमी होतो. म्हणून माणसाने नेहमी चुकांमधून शिकले पाहिजे. असे केल्याने कामात यश मिळण्याची शक्यता आणखीन वाढते.

स्वतःची प्रशंसा करणे

काही जण स्वतःची प्रशंसा करत राहतात आणि इतरांपेक्षा मागे पडतात. चाणक्याच्या मते, वारंवार आपल्या कामाची प्रशंसा केल्याने त्याचे महत्त्व कमी होते. व्यक्तीने नेहमी आपल्या कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे; यामुळे इतरांना आपल्या कामाचे कौतुक करण्यास प्रोत्साहन मिळेल.

गोष्टी न स्वीकारण्याची सवय

स्वतःच्या चुका मान्य करण्यास नकार देणारी मंडळी नेहमी अडचणीत येतात. अशा लोकांना समाजात आदर मिळत नाही. चाणक्याच्या मते, व्यक्तीने आपल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत, अन्यथा समस्या निर्माण होतात. याचा परिणाम वैयक्तिक जीवनावरही होतो.

लोभ

चाणक्यांच्या नीतीनुसार , व्यक्तीने नेहमी कठोर परिश्रमाने पैसे कमवावेत. लोभापोटी कधीही इतर चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नये. कधीकधी फसवणुकीने कमावलेला पैसाही नुकसान पोहोचवू शकतो.

खोटे बोलणे

कोणत्याही परिस्थितीत कधीही खोटे बोलू नये. जे लोक खोटे बोलतात ते नकारात्मकता आकर्षित करतात. चाणक्याच्या मते, खोटे बोलण्याने व्यक्तीची प्रतिष्ठाही कमी होते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)