habits make you old before time : सवयी या आपल्या जीवनाचा एक भाग बनतात. इच्छा नसतानाही आपण काही सवयींची पुनरावृत्ती करत असतो. कारण – एकदा लागलेली सवय मोडणे आणि एखादी नवीन सवय आंगिकारणे अवघडच असते. पण, प्रयत्न केल्यास या दोन्ही गोष्टी शक्य असतात आणि आपल्यालाच त्याचा फायदा होतो. कधीकधी, काही सवयी व्यक्तीसाठी त्रासाचे कारण बनू शकतात. त्याच सवयींचा उल्लेख आचार्य चाणक्य यांनी नीती ग्रंथात केला आहे, ज्याचे पालन केल्यास विविध समस्या आणि अकाली वृद्धत्व येऊ शकते.

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला उशीरा झोपण्याची सवय असते, त्या व्यक्तीचे शरीर हळूहळू त्याप्रमाणे तयार होते. आपल्या सवयींचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. जसजसं आपलं वय वाढतं, आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. वय वाढणं हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदलणं शक्य नसले तरीही काही वेळा आपल्या सवयींमुळेही हे होऊ शकतं. तर अशा कोणत्या वाईट सवयी आहेत ज्यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते याबद्दल जाणून घेऊयात…

सवयी लवकर बदला

आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. जी व्यक्ती सतत नकारात्मक विचार करते, ती नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता करत असते. विज्ञानाने हे देखील सिद्ध केले आहे की, मानसिक ताण आणि तणावामुळे वय वाढते. म्हणूनच नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना अकाली वृद्धत्व येते.

मोकळेपणाने जगा

आचार्य चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती स्वतःला खूप घट्ट बांधून ठेवते. ती आपल्या भावना आणि विचार प्रभावीपणे व्यक्त करू शकत नाही. याचा परिणाम तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. म्हणूनच, चाणक्य तुम्हाला तुमचे आयुष्य मुक्तपणे जगण्याचा सल्ला देतात.

लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात असेही नमूद केले आहे की, जे लोक खूप प्रवास करतात त्यांना अकाली वृद्धत्व येते. याचे कारण असे आहे की प्रवासात असताना त्यांना त्यांची दैनंदिन दिनचर्या आणि आहाराचे योग्य नियोजन करता येत नाही. शिवाय, वारंवार किंवा जास्त प्रवासामुळे शारीरिक थकवा येतो. म्हणून, जर तुम्ही प्रवासप्रेमी असाल, तर तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)