Key Traits of Highly Trustworthy Man : नाती केवळ गोड शब्द आणि सुंदर फोटोपर्यंत मर्यादित नसतात. खरी परीक्षा तर तेव्हा सुरु होते जेव्हा कठीण काळ सुरु होतो. प्रत्येक मुलीला असा कोणीतरी हवा असतो जो केवळ चांगल्या काळातच नव्हे, तर प्रत्येक परिस्थितीत आपली साथ देईल. पण, समोरची व्यक्ती खरोखरच विश्वास ठेवण्यास मात्र आहे की, केवळ चांगुलपणाचे सोंग करत आहे, हे समजणे अनेकदा कठीण जाते. अशा परिस्थितीत, प्राचीन ज्ञान आजही मार्ग दाखवते. चाणक्यांची तत्त्वे आजही आपल्याला एक खरा आणि विश्वासार्ह पुरुष ओळखण्यास मदत करतात.

संकटांपासून न पळणे

एक कणखर पुरुष संकटांपासून पळून जात नाही. जेव्हा परिस्थिती कठीण होत जाते. तेव्हा त्याचे खरे स्वरूप समोर येते. अशावेळी तो नात्यातून माघारही घेत नाही किंवा जबाबदाऱ्या टाळतही नाही. आपले काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखतो आणि आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करतो.

कमजोरी स्वीकारणे

पुरुष भावनांना घाबरत नाही. त्याच्यामध्ये स्वतःसोबत वेळ घालवण्याची आणि आपली कमजोरी स्वीकारण्याची क्षमता असते. अशी पुरुष मंडळी शांततेला घाबरत नाही, उलट तिचा उपयोग समजून घेण्याचे साधन म्हणून करतो. म्हणूनच तो आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

वचन पाळणे

आजकाल अनेक लोक मोठी वचने देतात. पण, त्यांची कृती त्या वचनांशी जुळत नाही. असे लोक सुरुवातीला आकर्षक वाटू शकतात. पण, त्यांचा खरा स्वभाव हळूहळू उघड होतो. जेव्हा ते सतत स्वतःची स्तुती करतात. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणेच उत्तम ठरते.

जबाबदारी घेणे

काही पुरुष जबाबदारी टाळतात, स्थिर नातेसंबंध टिकून राहू शकत नाहीत. कोणत्याही अडचणीसमोर आल्या की, सर्वात आधी माघार घेतात. नातेसंबंधांचे खऱ्या अर्थाने संगोपन करण्याऐवजी केवळ दिखाव्यासाठी नातं टिकवून ठेवतात. म्हणून, अशा व्यक्तींपासून दूर राहणे शहाणपणाचे आहे.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)