Chanakya Niti : कोणत्याही टीम, कुटुंब किंवा कार्यालयाची जबाबदारी सांभाळणे सोपे काम नसते. चांगला लीडर तो नाही, जो फक्त इतरांना काम देईल किंवा प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे मत लादेल; तर खरा लीडर तो असतो, जो सर्वांना सोबत घेऊन चालेल आणि कठीण काळात योग्य निर्णय घेऊ शकेल.
कधी कधी छोट्या छोट्या चुकांमुळेही एखाद्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होतात. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य यांच्या नीती आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. तुम्हालाही तुमची नेतृत्व क्षमता सुधारयची असेल, तर चाणक्य नीतीच्या ‘या’ ५ गोष्टींमधून शिकवण घेऊ शकता.
१. निर्णय घेण्यापूर्वी चांगला विचार करा
एका चांगल्या लीडरची ओळख त्याच्या निर्णयांवरून होते. घाईघाईने घेतलेला निर्णय अनेकदा संपूर्ण टीमसाठी अडचणी निर्माण करू शकतो. चाणक्य यांच्या धोरणांमधून शिकवण मिळते की, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे तपासले पाहिजेत.
२. स्वतःच्या कमकुवत बाजू ओळखा
प्रत्येक माणसात काही गुण असतात, तसेच काही दोषही असतात. चांगला नेता तो आहे, जो स्वतःच्या कमकुवत बाबी लपवण्याऐवजी त्या ओळखण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला एखाद्या कामाची संपूर्ण माहिती नसेल, तर ते शिकायला अजिबात संकोच करू नका. आपली चूक मान्य करणे म्हणजे कमकुवतपणा नसून, ती समजूतदारपणाची खूण आहे. त्यामुळे टीममधील लोकांचा विश्वासही वाढतो.
३. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्या
लीडर असण्याचा अर्थ असा नाही की, फक्त तुमचेच म्हणणे बरोबर असेल. टीममध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती चांगली क्षमता असू शकते. म्हणूनच इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका आणि त्यांच्या मताला महत्त्व द्या. चाणक्य यांच्या धोरणांमधूनही समजूतदारपणा बाळगण्याची आणि योग्य लोकांचा सल्ला घेण्याची शिकवण मिळते.
४. आपल्या योजना सर्वांसमोर उघड करू नका
कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी योग्य योजना आखणे गरजेचे असते; परंतु प्रत्येक योजनेबद्दल प्रत्येकाला सांगणे सुज्ञपणाचे ठरत नाही. चाणक्य नीतीमध्येदेखील कामाची गुप्तता राखण्याला आणि योग्य वेळी पाऊल उचलण्याला महत्त्व दिले गेले आहे. एका चांगल्या लीडरला ठाऊक असले पाहिजे की, कोणती गोष्ट कुणासोबत सामायिक करायची आहे.
५. कठीण काळात संयम ठेवा
लीडरची खरी परीक्षा तेव्हाच होते, जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते. कामात अपयश येणे, टीममध्ये मतभेद असणे किंवा अचानक एखादी अडचण निर्माण होणे ही अगदी सामान्य बाब आहे. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी किंवा रागवण्याऐवजी संयमाने काम करून घेता आले पाहिजे. चाणक्य यांच्या नीतीदेखील विपरीत परिस्थितीत समजूतदारपणा आणि संयम राखण्याची शिकवण देतात. चांगला लीडर तोच आहे, जो कठीण काळात स्वतःला सावरतो आणि इतरांनाही धीर देतो.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
