Chanakya Niti : तुम्ही कधी विचार केला आहे का की, तीच परिस्थिती, तेच लोक आणि तेच आयुष्य असूनही काही लोक वेगळा विचार कसा करतात आणि आयुष्यात पुढे कसे जातात? कारण- हा सर्व फरक त्यांच्या दृष्टिकोनाचा असतो. हाच दृष्टिकोन माणसाला एक तर पुढे नेतो किंवा आहे तिथेच रोखून धरतो. आचार्य चाणक्य यांच्या गोष्टींमध्ये हा दृष्टिकोन बदलण्याची अफाट ताकद आहे. त्यांच्या नीती आजही तितक्याच प्रभावी आहेत, जर तुम्ही या गोष्टी समजून घेऊन अमलात आणल्या, तर तुमचे निर्णय घेण्याची पद्धत बदलेल आणि अनेक अडचणी आपोआप सोप्या वाटू लागतील.

१. योग्य संगत तुमची दिशा ठरवते

लोक बदलतात, सवयीही बदलतात : चाणक्य स्पष्टपणे सांगतात की, माणूस एकटा बदलत नाही, तर त्याच्या आजूबाजूचे लोकही त्याला बदलत असतात. जर तुम्ही अशा लोकांबरोबर वेळ घालवला, जे कष्टाळू आहेत, ज्यांना काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे आणि जे पुढे जाण्याचा विचार करतात, तर हळूहळू तुम्ही त्यांच्याबरोबर राहून हेच विचार करता. परंतु, जर संगत चुकीची असेल, तर त्याचा वाईट परिणामही तितक्याच वेगाने दिसून येतो. अनेकदा आपण पाहतो की, एखादी चांगली व्यक्ती चुकीच्या लोकांच्या संगतीत पडून आपली योग्य दिशा हरवून बसते. म्हणूनच मित्र निवडणे किंवा आपल्या आजूबाजूचे वातावरण तयार करणे ही कोणतीही लहान गोष्ट नाही.

२. वेळेचे महत्त्व समजणे

आज टाळाल, तर उद्या पस्तावाल, वेळेच्या बाबतीत चाणक्य यांचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत- ‘जी वेळ निघून गेली, ती गेली. ती कधीही परत येत नाही.’ आजच्या काळातील सर्वांत मोठी समस्या हीच आहे की, लोक कामे पुढे ढकलत राहतात. “उद्या करू” ही सवय हळूहळू आयुष्यातील सर्वांत मोठा अडथळा बनते. समजा, तुम्ही एखादे काम योग्य वेळी केले नाही, तर नंतर तेच काम अधिक कठीण आणि ओझे वाटू लागते. याउलट, जे लोक वेळेचा योग्य वापर करतात, त्यांना पुढे जाण्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागते. वेळेचे महत्त्व समजणे म्हणजेच अर्धे यश मिळवण्यासारखे आहे.

३. ज्ञान हीच तुमची खरी ताकद

पैसा संपू शकतो; पण शिकवण नाही : आजच्या काळात लोक अनेकदा पैसा आणि पद म्हणजेच सर्वकाही मानतात. परंतु, चाणक्य यांच्या मते, खरी ताकद ही ज्ञानात असते. पैसा कधीही कमी किंवा जास्त होऊ शकतो; पण तुम्ही जे शिकता, ते नेहमी तुमच्याबरोबर राहते. एक छोटेसे उदाहरण घ्या- जर एखाद्याकडे चांगली समज आणि अनुभव असेल, तर तो कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढू शकतो. याउलट, केवळ पैशावर अवलंबून असणारा माणूस संकट येताच घाबरून जातो. म्हणूनच शिकणे कधीही थांबवू नका. मग ते पुस्तकांतून असो, लोकांकडून असो किंवा स्वतःच्या अनुभवातून असो- प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुढे नेण्यास मदत करते.

४. प्रत्येकावर अंधपणे विश्वास ठेवणे

समजूतदारपणा विश्वास आणि सावधगिरी यांच्यात आहे : चाणक्य यांची ही गोष्ट आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची ठरते. प्रत्येक माणूस जसा दिसतो, तसा नसतो. अनेकदा लोक समोरून चांगले वाटतात; पण त्यांचे हेतू वेगळे असतात. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रत्येकावर संशय घ्यावा; पण डोळे मिटून विश्वास ठेवणेही चुकीचे आहे. खरी हुशारी यातच आहे की, तुम्ही लोकांना योग्य वेळ देऊन पारखा. त्यांचे वर्तन पाहा, त्यांचे निर्णय समजून घ्या आणि मगच विश्वास ठेवा. आजच्या वेगवान जगात लोक जितक्या लवकर नाती बनवतात, तितक्याच लवकर ती तुटतातसुद्धा. याचे एक मोठे कारण म्हणजे आपण लोकांना योग्य प्रकारे समजून घेऊ शकत नाही.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)