Chanakya Niti: अनेक वेळा आपल्या घरात अचानक भांडणं वाढू लागतात आणि त्यामागचं नेमकं कारण समजत नाही. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये सांगितलं आहे की, घरातील सदस्यांच्या काही अशा सवयी असतात, ज्यामुळे घरात समस्या निर्माण होतात आणि कुटुंबाचंही नुकसान होऊ शकतं.

पती-पत्नीमध्ये अशा कोणत्याही सवयी असतील, तर त्यांचं नातं खराब होतंच आणि त्याचा थेट परिणाम घरातील इतर सदस्यांवरही होतो. या सवयी हळूहळू घराचा पाया कमकुवत करू लागतात आणि असं घर लवकरच उद्ध्वस्त होऊ शकतं. चला, पती-पत्नीने कोणत्या सवयी लगेच सोडल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

एकमेकांपासून गोष्टी लपवणे

जर पती-पत्नी एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत असतील, तर त्यांचं नातं हळूहळू कमकुवत होऊ लागतं. दोघांपैकी एकानेही असं केलं, तर हळूहळू एकमेकांवरील विश्वास कमी होतो आणि दोघांमध्ये दुरावा वाढू लागतो.

सुखी संसारासाठी घरातील सर्व सदस्यांमध्ये आपसात चांगला समन्वय असणं गरजेचं आहे. विशेषतः पती-पत्नीने एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, ही सवय बदलणं हे सुखी वैवाहिक जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे.

एकमेकांशी खोटं बोलणे

खोटं बोलल्यामुळे कोणतंही नातं कमकुवत होतं. पती-पत्नी एकमेकांशी खोटं बोलत असतील, तर घरात भांडणं आणि वाद होऊ लागतात. यामुळे पती-पत्नीचं नातं तर खराब होतंच, पण त्याचा मुलांच्या भविष्यावरही वाईट परिणाम होतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये खोटं बोलणं हे मोठं पाप असल्याचं सांगितलं आहे.

एकमेकांना कमी लेखणे

अनेक वेळा पती-पत्नी नकळत एकमेकांना अशा गोष्टी बोलतात, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनाला दुखापत होते. असं केल्याने त्यांचं नातं खराब होतं आणि एकमेकांमधील नाराजीमुळे घरातील वातावरणही बिघडतं.

पती-पत्नीच्या अशा वागण्याचा परिणाम मुलांवरही होतो आणि त्यामुळे संसारात अडचणी निर्माण होऊ लागतात. आचार्य चाणक्य सांगतात की, पती-पत्नीने नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे.

विनाकारण राग करणे

प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग करण्याची सवय घरातील समस्यांचं कारण बनू शकते. पती आणि पत्नी जर एकमेकांवर विनाकारण राग करत असतील, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या संसारावरही होतो. त्यामुळे घरातील वातावरण खराब होऊ नये आणि एकमेकांमधील प्रेम टिकून राहावं यासाठी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

खूप जास्त स्वार्थी असणे

आचार्य चाणक्य सांगतात की, सुखी जीवनासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःचा विचार न करता इतरांचाही विचार केला पाहिजे. स्वार्थी व्यक्तीमुळे अनेक वेळा विनाकारण संसारात अडचणी निर्माण होतात. पती-पत्नीचा स्वार्थी स्वभाव हा आपसातील भांडणांचं एक मोठं कारण ठरतो.

तुमच्या घरातही पती-पत्नीच्या अशा सवयी असतील, तर त्या सवयी लगेच बदलण्याचा प्रयत्न करा. या सवयी बदलल्या नाहीत, तर भविष्यात त्याचे वाईट परिणाम पाहायला मिळू शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)