Chanakya Niti Important qualities every family member should have : आचार्य चाणक्य एक महान सल्लागार आणि कुशल राजकारणी होते. त्यांनी ‘चाणक्य नीती’ नावाचा नीतिशास्त्राचा ग्रंथ रचला. या ग्रंथात त्यांनी जीवनाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा केली आहे. आजही ही तत्त्वे लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात. त्यापैकी एक म्हणजे कुटुंब. तर चाणक्यांनी कुटुंबाशी संबंधित अनेक पैलूंचाही उल्लेख केला आहे.
खरोखरच, व्यक्तीच्या जीवनात कुटुंबाला खूप महत्त्व आहे. संकटाच्या वेळी ढाल तर आनंदाच्या वेळी कौतुकाची थाप देऊन कुटुंबच आपल्या नेहमी पाठीशी उभे राहते. तर चाणक्य नीतीनुसार, घरात आनंद टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. जिथे आनंद नेहमी नांदतो, अशा घराविषयी त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. चला तर याबद्दल अधिक जाणून घेऊयात…
अशा घरात नेहमी नांदतो आनंद
आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या घरातील मुले बुद्धिमान आणि पत्नी मृदुभाषी असते; असे घर नेहमीच धन्य मानले जाते. तसेच, ज्या कुटुंबाची समृद्धी कठोर परिश्रम आणि प्रामाणिक कमाईवर अवलंबून असते असे कुटुंबही खऱ्या अर्थाने धन्य असते.
चाणक्यांच्या मते, ज्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहतात, एकमेकांना साथ देतात, प्रामाणिकपणे पैसे कमावतात असे कुटुंब नेहमी आनंदी आणि समृद्ध असते.
ज्या घरात पाहुण्यांना आदर व सन्मानाने वागवले जाते, तिथे नेहमी सकारात्मक वातावरण असते. शिवाय, अशा कुटुंबात आनंद आणि समृद्धी सैदव राहते.
आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या कुटुंबात नियमितपणे आणि वेळेवर देवाची प्रार्थना केली जाते, त्या घरातही नेहमी आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहते.
नीती ग्रंथात लिहिलीपरामाने ज्या घरात नेहमी थोर पुरुषांच्या संगतीत राहण्याची संधी मिळते, त्या घरातही सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते.
ज्या कुटुंबात स्त्रियांना देवीप्रमाणे वागवले जाते असे कुटुंब नेहमी धन्य असते आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते.
