Smartest People Can Become Poor If They Fall Into 3 Traps : चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक आहे “मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च, दुःखिते सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति!” या श्लोकात आचार्य चाणक्य अशा तीन कृतींचा उल्लेख करतात, ज्या एका ज्ञानी आणि बुद्धिमान व्यक्तीलाही दुःख आणि दारिद्र्याकडे नेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला या श्लोकातील तीन महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहोत, जे एका बुद्धिमान व्यक्तीलाही दारिद्र्याकडे नेऊ शकतात.

आचार्य चाणक्य यांचा श्लोकाचा अर्थ असा आहे की, ज्या व्यक्तीला योग्य-अयोग्य समजून घ्यायची इच्छा नाही, त्याला कितीही चांगला सल्ला दिला तरी त्याचा फायदा होत नाही. मूर्खाला ज्ञान देणे हा स्वतःचाच अपमान करून घेण्यासारखे आहे. कारण – मूर्ख तुमच्या ज्ञानाचा गैरवापर करून तुम्हाला हानी पोहोचवू शकतो किंवा तुमच्या शब्दांचा वापर करून तुमची बदनामीही करू शकतो. मूर्खांना शिकवणे हा गुरूचाही अपमान आहे. म्हणून, मूर्खांना किंवा मर्यादित बुद्धीच्या लोकांना कधीही सल्ले देऊ नये; असे केल्याने केवळ तुम्हीच दुःखी व्हाल.

आचार्य चाणक्य म्हणतात की, एखादी व्यक्ती कितीही बुद्धिमान, ज्ञानी किंवा चांगली असली तरी जर ती चुकीच्या, दुष्ट किंवा अनैतिक वागणाऱ्या जोडीदाराच्या कृत्यांना पाठिंबा देत असेल, तर तिलाही त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

नीती ग्रंथामध्ये चाणक्य सांगतात की, जे लोक दुःखी लोकांसोबत जास्त वेळ घालवतात, ते स्वतःही नकारात्मकतेत गुरफटून जाऊ शकतात. दुःखी लोकांच्या संगतीत जास्त वेळ घालवल्याने एक शहाणी व्यक्तीसुद्धा दुःखी आणि नकारात्मक होऊ शकते. म्हणून, गरीब आणि गरजू लोकांना मदत करा, पण त्यांच्याशी जास्त संपर्क टाळा.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)