These Situations Can Leave a Person Alone : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. त्यांनी आपले अनुभव आणि विचार चाणक्य नीती ग्रंथात श्लोकांच्या स्वरूपात लिहिले आहेत. जर एखादी व्यक्ती आपल्या वास्तविक जीवनात चाणक्याच्या धोरणांचे पालन करते. तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यात केवळ वैयक्तिकच नव्हे. तर सामाजिक कल्याणासाठीही मौल्यवान गोष्टी आहेत. चाणक्य नीतीतील काही श्लोकात आचार्य चाणक्यांनी सहा परिस्थिती सांगितल्या आहेत, जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत येते आणि तिचे जवळचे लोकही तिची साथ सोडतात.
त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं पुत्राश्च दाराश्च सुहृज्जनाश्च।
तमर्शवन्तं पुनराश्रयन्ति अर्थो हि लोके मनुषस्य बन्धु:।।
चाणक्य नीतीच्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसतो, तेव्हा त्याचे मित्र, पत्नी, मुलगा, भाऊ, नोकर आणि सर्वजण त्याला सोडून जातात. याउलट, जेव्हा त्याला पुन्हा संपत्ती मिळते, तेव्हा ते सर्व पुन्हा त्याच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. या जगात पैसा हा माणसाचा एक महत्त्वाचा आधार अगदी मित्र मानला जातो. संपत्तीच्या व्यावहारिक पैलूवर प्रकाश टाकताना ते म्हणतात की, अनेकदा मानवी नातेसंबंधही पैशाभोवती फिरताना दिसतात. त्यामुळे पैसा आणि नातेसंबंध यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे चाणक्यांनी स्पष्ट केले आहे.
अन्यायोपार्जितं वित्तं दशवर्षाणि तिष्ठति।
प्राप्ते चैकादशे वर्षे समूलं तद् विनश्यति।।
चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा माणसाकडे जास्तीत जास्त १० वर्षे राहतो आणि ११ वे वर्ष सुरू होताच व्याज आणि मुद्दलासह नष्ट होतो. म्हणजेच, माणसाने चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये. उलट, माणसाने आपल्या प्रयत्नांनी पैसा कमवावा आणि त्याची बचतही करावी.
दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः ।
सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे ।।
दुष्ट माणसापेक्षा एखादा जंगलातील साप बरा. कारण – साप तेव्हाच एखाद्याला चावतो. जेव्हा त्याला समोरच्या व्यक्तीकडून नुकसान होणार असते. पण, दुष्ट प्रवृत्तीचा माणूस नेहमी त्रास देण्याची संधी शोधत असतो. चाणक्याच्या मते, दुष्ट व्यक्ती तुमचे कधीही भलं होऊ देत नाही.
प्रलये भिन्नमार्यादा भविंत किल सागर:
सागरा भेदमिच्छन्ति प्रलेयशपि न साधव:।
जेव्हा एखादे महासंकट समोर येते. तेव्हा समुद्रसुद्धा आपल्या सीमा ओलांडतो. पण, एक चांगला माणूस महासंकटासारख्या भयंकर संकटात आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मर्यादा ओलांडत नाही. चांगली माणसे संयमी असतात. ते केवळ आपल्या आत्मसंयमानेच यशस्वी होतात.
