Chanakya Niti for Confidence : ‘चाणक्य नीती’मध्ये आचार्य चाणक्य यांनी राजकारण आणि राजनैतिकतेपासून ते कौटुंबिक जीवनापर्यंत सर्व गोष्टींवर सविस्तरपणे लिहिल्या आहेत. म्हणून आज, आम्ही चाणक्य नीतीमधील काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही जीवनात नक्कीच उपयोग करून बघितला पाहिजे…

१. काम

“न स्नेहात् कृत्वा विघ्नं न द्वेषात् न च लोभतः।
न मोहत् कार्यमत्यन्तं कार्यं कार्यवदाचरेत्॥”

श्लोकात सांगण्यात आले आहे की, कोणतेही काम प्रेम, द्वेष, लोभ किंवा मोहापोटी नव्हे तर कर्तव्य म्हणून केले पाहिजे. कारण – काम यासाठीच पात्र असते. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एखादे कार्य करता. तेव्हा तुमचे निर्णय योग्य ठरतात, तसेच प्रत्येकाशी पक्षपात न करता न्यायाने वागणे आणि कोणतीही गोष्ट समजून-, शहाणपणाने निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे, हे दाखवून देतात.

२. पैसा

आपदर्थे धनं रक्षेच्छ्रीमतां कुत आपदः ।
कदाचिच्चलते लक्ष्मीः सञ्चितोऽपि विनश्यति ॥

चाणक्य नीतीमधील या श्लोकाचा अर्थ असा आहे की, कठीण काळाला तोंड देण्यासाठी पैसे सांभाळून ठेवावे लागतात. असे मानले जाते की, संपत्तीची देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे. त्यामुळे पैसा कायम बरोबर राहत नाही. तो स्वतःजवळ हुशारीने, गुंतवणूक करून साठवून ठेवावा लागतो. म्हणून, श्रीमंत व्यक्तीला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही, असा विचार करण्याची चूक कोणीही करू नये.

३. चुका

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति चाध्रुवं नष्टमेव हि ॥

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जो माणूस क्षणिक गोष्टीच्या मोहापायी कायमस्वरूपी आणि मौल्यवान गोष्टीचा त्याग करतो. तो शेवटी दोन्ही गमावतो. त्यामुळे अखेरीस त्याच्या हातात काहीच उरत नाही.

४. स्वतःचे रक्षण करा

परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् ।
वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भं पयोमुखम् ॥

चाणक्य नीतीमधील या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जे लोक तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागे तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचतात, अशा लोकांना आयुष्यातून दूर ठेवावे. आचार्य चाणक्यांनी अशा लोकांची तुलना विषाच्या अशा भांड्याशी केली आहे, ज्याचा पृष्ठभाग दुधाने भरलेला दिसतो.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)