Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र, राजकारण आणि मुत्सद्देगिरी या विषयांमधील तज्ञ मानले जातात. चाणक्यांनी आपल्याला अशी धोरणे शिकवली आहेत की, जर आपण ती आपल्या जीवनात अवलंबली, तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीने चाणक्य नीतीचा अवलंब केला, तर त्याला कोणीही फसवू शकत नाही. आज आम्ही आचार्य चाणक्यांचे एक असे धोरण सांगणार आहोत, जे प्रत्येकाने आपल्या जीवनात अवलंबले पाहिजे.
आचार्य चाणक्यांनी अशी विशिष्ट कामे सांगितली आहेत, जी पूर्ण केल्यावर लगेच स्नान करणे आवश्यक असते. असे न केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आपण सहसा सकाळी स्नान करतो, परंतु आज आम्ही आचार्य चाणक्यांची जी तत्त्वे सांगणार आहोत, त्यानुसार जर तुम्ही ती कामे आधीच पूर्ण केली असतील, तर सकाळच्या व्यतिरिक्त इतर वेळी कधी स्नान करावे हे स्पष्ट होते.
श्लोक
तैलभ्यंगे चिताधूमे मैथुनें क्षौरकर्मणि ।
तवद् भवति चांडालो यवत स्नानम् न चाचेरेत् ।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला तेलाने मालिश करता, किंवा कोणाच्या अंत्यविधीवरून परत येता, किंवा तुम्ही एखाद्या पुरुष किंवा स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवले असतील, किंवा तुम्ही तुमचे केस कापले असतील, अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब स्नान करावे, असे केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील.
अंत्यविधीहून परत आल्यावर
जर तुम्ही कोणाच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रेत सहभागी झाला असाल, तर स्नान केल्याशिवाय घरी परत येऊ नका. कारण स्मशानभूमीला भेट दिल्याने तुमच्यासोबत अनेक जंतू येतात, त्यामुळे ते तुमच्या घरी पोहोचू नयेत म्हणून घरात प्रवेश करण्यापूर्वी स्नान करा.
तेलाने शरीराची मालिश केल्यानंतर
शरीराला तेल लावल्याने केवळ शरीराला आरामच मिळत नाही, तर हाडेही मजबूत होतात. त्यामुळे, तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी शरीराला तेलाने मालिश केली पाहिजे. यामुळे तुमच्या शरीरावर चमकही येते. मात्र, याचे खरे फायदे मिळवण्यासाठी तेल लावल्यानंतर अंघोळ केली पाहिजे. यामुळे अशुद्धी दूर होऊन तुमचे शरीर तेजस्वी दिसेल.
केस कापल्यानंतर
आचार्य चाणक्यांच्या मते, केस कापल्यानंतर लगेच स्नान करावे, कारण केस कापल्यावर लहान केस आपल्या शरीराला चिकटतात आणि स्नान केल्यावर ते केस निघून जातात, ज्यामुळे आपण आजारी पडण्यापासून वाचतो.
