Chanakya Niti : आचार्य चाणक्य त्यांच्या अथांग ज्ञानासाठी आणि तल्लख बुद्धिमत्तेसाठी आजही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे विचार आणि शिक्षण, विशेषतः जीवन व्यवस्थापनाशी संबंधित गोष्टी आजही तितक्याच उपयुक्त आहेत, जितक्या पूर्वी होत्या.
त्यांचे विचार समजून घेऊन कोणतीही व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटांचा सामना सहज करू शकते. चाणक्य यांच्या मते, पुरुषांनी चार प्रकारच्या महिलांपासून दूर राहिले पाहिजे; कारण त्या घरातील शांती आणि सुख दोन्ही हिरावून घेऊ शकतात. चला तर मग, अशा महिलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
लोभी महिलांपासून दूर राहा: आचार्य चाणक्य त्यांच्या नीतिशास्त्रात पुरुषांना सावध करताना सांगतात की, लोभी महिलांशी कधीही मैत्री करू नये. कारण त्यांचा खरा उद्देश पैसा मिळवणे हा असतो, व्यक्तीवर प्रेम करणे नाही. जेव्हा पुरुषाकडील पैसे किंवा संपत्ती कमी होते, तेव्हा त्यांचे प्रेमही कमी होऊ लागते आणि त्यांचे खरे रूप समोर येते. अशा महिला पैशाच्या हावेपायी दुसऱ्यांचे नुकसान करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.
रागिष्ट महिलांपासून लांब राहा: पुरुषांनी खूप जास्त राग येणाऱ्या महिलांपासूनही अंतर ठेवून राहावे. अशा स्त्रीबरोबर राहणे म्हणजे नरकात राहण्यासारखे आहे. रागाच्या भरात अशा महिला अनेकदा चुकीचे वर्तन करतात, ज्यामुळे पुरुषाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते आणि समाजात त्याचे हसे होते.
सतत संशय घेणाऱ्या महिलांपासून दूर राहा: जर एखादी महिला तुमच्यावर वारंवार संशय घेत असेल, तर तिच्याबरोबरचे नाते लवकरात लवकर संपवणे योग्य ठरते. सतत संशय घेणाऱ्या स्त्रीसह राहिल्याने कैद्यासारखे वाटू शकते आणि मनातील शांतता पूर्णपणे निघून जाते. अशा महिला आपल्या जोडीदारावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, जे नातेसंबंधांसाठी योग्य नाही.
उधळपट्टी करणाऱ्या महिलांपासून सावध राहा: ज्या महिला प्रमाणापेक्षा जास्त खर्च करतात, पुरुषांनी अशा महिलांपासून दूर राहिले पाहिजे. तुम्ही त्यांच्याबरोबर जितका जास्त वेळ घालवाल, तितकेच तुमचे आर्थिक नुकसान होईल. अशा महिला भविष्याची पर्वा न करता फक्त आजच्या दिवसात जगतात. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे हाच योग्य निर्णय आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
