Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात मानवी जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य नीती ही सर्वात महत्त्वाच्या नीतींपैकी एक मानली जाते.

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीमध्ये अशा एका चुकीबद्दल सांगितले आहे, जी कोणत्याही व्यक्तीला नुकसानात टाकू शकते. चला जाणून घेऊया, चाणक्य नीतीनुसार कोणती चूक करण्यापासून नेहमी दूर राहायला हवे.

करू नका ‘ही’ चूक

आचार्य चाणक्य म्हणतात, एखादी व्यक्ती स्वतःला कितीही भाग्यवान समजत असली तरी कोणतेही काम विचार न करता सुरू करू नये. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याचा योग्य आराखडा तयार करणे गरजेचे असते. त्यामुळे ते काम व्यवस्थित पूर्ण करता येते. मात्र, जे लोक विचार न करता कोणतेही काम सुरू करतात, त्यांना आयुष्यात नुकसान सहन करावे लागू शकते. अशा लोकांना प्रगती करता येत नाही आणि त्यांच्या हातात असलेल्याही गोष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते.

ध्येय पूर्ण होणार नाही

आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल, तर त्याने आपले ध्येय कोणालाही सांगू नये. कारण ध्येय इतरांना सांगितल्यास पुढे त्याचा तोटा होऊ शकतो. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही तुमचे ध्येय सांगता, तीच व्यक्ती भविष्यात तुमचा विश्वासघात करू शकते. त्यामुळे आपले ध्येय शक्यतो स्वतःपुरतेच ठेवावे.

आचार्य चाणक्यांचा सल्ला

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीमध्ये नेहमी प्रामाणिक आणि निष्ठावान राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, अप्रामाणिक व्यक्ती एक ना एक दिवस स्वतःची प्रतिष्ठा गमावते आणि स्वतःच्या नातेसंबंधांनाही तडा देते. याउलट, प्रामाणिक व्यक्ती इतरांच्या मनात विश्वास निर्माण करते. हाच विश्वास पुढे जाऊन यशाची नवी दारे उघडण्यास मदत करतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)