Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार माणसाचे जीवन अनमोल आहे. या जीवनाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. जे लोक जीवनाचे महत्त्व ओळखत नाहीत, ते आयुष्यभर चिंता, अडचणी आणि दुःखांचा सामना करत राहतात. अशा लोकांच्या जीवनात सुख आणि शांतीचाही अभाव असतो. तसेच त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपाही होत नाही. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल, तर चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कधीही विसरू नका.
लक्ष्याप्रती कायम समर्पित राहा
चाणक्य नीतीनुसार प्रत्येकाने आपल्या ध्येयाबाबत नेहमी गंभीर असले पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. समर्पणाची भावना माणसाला आपले ध्येय साध्य करण्याची ताकद देते. जे लोक आपल्या ध्येयापासून भरकटतात किंवा ध्येय मिळवण्यासाठी मेहनत आणि शिस्त सोडून इतर पर्यायांकडे वळतात, त्यांना यश मिळत नाही. जरी काही प्रमाणात यश मिळाले, तरी ते फार काळ टिकत नाही.
स्वार्थी बनू नका
चाणक्य नीतीनुसार माणसाने स्वार्थी बनू नये. स्वार्थी लोक आपल्या गुणांचा आणि क्षमतेचा योग्य वापर करू शकत नाहीत, कारण ते अनेकदा आपल्या मूळ उद्दिष्टापासून दूर जातात. पुढे जाऊन अशा लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
स्वार्थामुळे माणूस लोभीही बनतो. अशा लोकांची विचारसरणी फक्त स्वतःच्या फायद्यापुरती मर्यादित राहते. यश मिळवण्यासाठी ते चुकीच्या मार्गाचाही अवलंब करतात, त्यामुळे त्यांना बदनामीलाही सामोरे जावे लागते. अशा लोकांना समाजात मान-सन्मान मिळत नाही. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी माणसाने नेहमी चांगले गुण अंगीकारले पाहिजेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
