chanakya niti on Peaceful life : आचार्य चाणक्यांची तत्त्वे केवळ इतिहासाच्या पानांपुरती मर्यादित नाहीत; ती आजही प्रासंगिक आहेत. आजच्या जगात, जिथे आपण सतत मतभेद, स्पर्धा आणि तुलनांमध्ये गुंतलेले असतो, तिथे चाणक्य आपल्याला सावध करतात की, प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे कशाप्रकारे हानिकारक ठरू शकते. आचार्य चाणक्य त्यांच्या ‘चाणक्य नीती’मध्ये स्पष्टपणे सांगतात की, काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत. अशा गोष्टी मित्र -मैत्रिणी अगदी नातेवाईकांना सांगितल्यास भविष्यात नुकसान होऊ शकते.

त्यांच्या म्हणण्यानुसार खरे ज्ञान काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवण्यात आहे, जेणेकरून आपण आपली प्रतिष्ठा, मानसिक शांती आणि भविष्य सुरक्षित ठेवू राहील. आचार्य चाणक्य त्यांच्या ‘नीतीशास्त्र’मध्ये सांगतात की, अशा ११ गोष्टी आहेत ज्या आपल्या नातेवाईकांना कधीही सांगू नयेत. चला, या ११ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

१. उत्पन्न

आपले खरे उत्पन्न कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कधीही उघड करू नका. आपले उत्पन्न सांगितल्याने नातेवाईकांमध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो. म्हणून आर्थिक बाबी शक्य तितक्या लपवून ठेवल्या पाहिजेत.

२. प्रेम आणि वैयक्तिक क्षण

तुमचे प्रेम आणि वैयक्तिक क्षण कोणाशीही शेअर करू नका. तुमचे वैयक्तिक क्षण किंवा प्रेम बाहेरच्या लोकांशी, अगदी तुमच्या नातेवाईकांशीही शेअर करू नका. असे केल्याने नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात गैरसमज आणि संशय निर्माण होऊ शकतो.

३. संघर्ष

तुमच्या भूतकाळातील गरिबीबद्दल किंवा तुम्ही आज ज्या स्थानावर आहात तिथे पोहोचण्यासाठी आलेल्या अडचणींबद्दल इतरांना सांगणे टाळा. लोक अनेकदा तुमच्या मेहनतीचे कौतुक करण्याऐवजी तुमच्या भूतकाळातील परिस्थितीला तुमची कमजोरी समजू शकतात.

४. कौटुंबिक वाद

कौटुंबिक संघर्ष आणि वाद नेहमी घराच्या चौकटीतच मर्यादित ठेवले पाहिजेत. या गोष्टी घराबाहेर चर्चिल्या गेल्या, तर त्या केवळ इतरांसाठी चर्चेचा विषय बनतात आणि त्याचा परिणाम कुटुंबाच्या प्रतिष्ठेवरही होऊ शकतो.

५. मोठ्या योजना

जोपर्यंत तुम्ही यश प्रत्यक्षात मिळवत नाही तोपर्यंत त्याबद्दल बढाई मारणे टाळा. तुमच्या योजना उघड केल्याने त्या पूर्ण होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

६. मानसिक त्रास आणि भावनिक दुःख

काही निवडक लोकांना तुमची अजिबात पर्वा नसते. जर तुम्ही तुमचे भावनिक दुःख सर्वांसमोर मांडले, तर काही लोक सहानुभूती दाखवण्याऐवजी भविष्यात त्याचा तुमच्याविरुद्ध त्याचा वापर करू शकतात.

७. इतरांशी तुलना करणे

आचार्य चाणक्य म्हणतात, स्वतःची इतरांशी कधीही तुलना करू नका. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि ऐकणारे तुमच्या आत्मविश्वासाच्या कमतरतेचा फायदा घेऊ शकतात.

८. गुप्त दान आणि सेवा

आचार्य चाणक्य म्हणतात की, दान गुप्तपणे केल्यावरच त्याचे खरे फळ मिळते. जर तुम्ही इतरांसमोर तुमच्या उदारतेची बढाई मारली, तर ते दान न राहता केवळ एक देखावा बनतो.

९. कमकुवतपणा आणि भीती

तुम्ही तुमच्या कमकुवतपणा आणि भीती इतरांना कधीही सांगू नये. चाणक्य म्हणतात की, शत्रू आणि मत्सर करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या कमकुवतपणाची जाणीव असते आणि तुम्हाला हरवण्यासाठी त्यांना कोणत्याही शस्त्राची गरज भासणार नाही.

१०. चुका आणि वाईट सवयी

प्रत्येकजण आयुष्यात चुका करतो. त्यामुळे तुमच्या भूतकाळातील उणिवांवर विचार करत बसू नका. कारण – त्यामुळे लोक तुमच्या सध्याच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करू शकतात आणि तुमच्या चुकांवरून तुमची चेष्टा करू शकतात.

११. अपूर्ण प्रकल्प आणि स्वप्न

जे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्याबद्दल आधीच चर्चा करणे टाळा. कारण ते काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाले नाही, तर लोक तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करू शकतात आणि तुमचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करू शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)