Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान कूटनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व नीतिशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितलेल्या नीतींमध्ये जीवन यशस्वी बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने आचार्य चाणक्य यांच्या नीतींचे पालन केले, तर त्याला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चाणक्यांनुसार, माणसाने आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नये. अनेकदा आपण कोणावरही आंधळा विश्वास ठेवतो, ज्याचे परिणाम नंतर अत्यंत वाईट होतात. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या ५ लोकांसमोर आपले गुपित कधीही उघड करू नये.

१. स्वार्थी आणि म्हातारे लोक

आचार्य चाणक्य सांगतात की, फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या आणि स्वार्थी स्वभाव असलेल्या लोकांसमोर आपली गुपिते कधीही सांगू नयेत. अशा लोकांवर चुकूनही विश्वास ठेवू नये. हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी वेळ आल्यावर तुमचे गुपित कोणासमोरही उघड करू शकतात.

२. हाव असणारे लोक

हाव असलेल्या लोकांपासून नेहमी चार हात दूर राहिले पाहिजे. अशा व्यक्तींबरोबर आपल्या खासगी गोष्टी शेअर करू नयेत. हे लोक पैशाच्या किंवा स्वतःच्या फायद्याच्या लालसेपोटी तुमची गुपिते इतरांना सांगू शकतात. स्वतःच्या फायद्यासाठी ते तुमचे नुकसान करायला किंवा चुगली करायला मागे-पुढे पाहत नाहीत.

३. गरजेपेक्षा जास्त बोलणारे लोक

जे लोक गरजेपेक्षा जास्त बोलतात, ते अनेकदा बडबडीच्या ओघात तुमच्या खासगी गोष्टी इतरांसमोर बोलून जातात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावे आणि त्यांच्याशी महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणे टाळावे.

४. अति रागीट लोक

रागाच्या भरात कोणतीही व्यक्ती स्वतःवरील ताबा गमावते. म्हणूनच ज्या लोकांना खूप जास्त राग येतो, त्यांच्यासमोर आपले गुपित कधीही उघड करू नये. असे लोक एखाद्या छोट्या कारणावरून रागावल्यास रागाच्या भरात तुमच्या गुप्त गोष्टी इतरांना सांगू शकतात.

५. सतत खोटे बोलणारे लोक

आचार्य चाणक्य सांगतात की, ज्यांना सतत खोटे बोलण्याची सवय असते, त्यांच्यासमोर आपल्या गोष्टी कधीही सांगू नयेत. असे लोक कुठेही खोटे बोलू शकतात आणि तुमच्या खासगी गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवू शकतात.

प्रत्येक व्यक्तीने या ५ प्रकारच्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. कारण- हे लोक संधी मिळताच कोणाचाही विश्वासघात करू शकतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)