Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्ती ज्या ठिकाणी काम करते किंवा जिथपर्यंत तिच्या कामाची जबाबदारी असते, त्या ठिकाणी नेहमी उच्च आदर्शांचे पालन करावे. कामाचे ठिकाण हे आपल्या उपजीविकेचे साधन असते. त्यामुळे ते एक पवित्र स्थान मानून आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.

ऑफिसमध्ये काम करताना कधीही चुकीचे वर्तन करू नये. जे लोक ऑफिसच्या नियमांचे आणि मर्यादांचे पालन करत नाहीत, त्यांना ना वरिष्ठांचा विश्वास मिळतो, ना सहकाऱ्यांचे सहकार्य मिळते. अशा लोकांची प्रतिमाही खराब होते. त्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.

नम्रपणे वागा

ऑफिसमध्ये आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांशी नेहमी नम्रपणे वागावे. कोणत्याही परिस्थितीत नम्रपणा सोडू नये. नम्र स्वभावामुळे व्यक्तिमत्त्व अधिक चांगले दिसते. नम्र व्यक्ती उत्साही असते आणि कोणतेही काम करण्यासाठी नेहमी तयार असते.

शिस्तीचे पालन करा

ऑफिसमध्ये कधीही शिस्त मोडू नका आणि शिस्त मोडणाऱ्यांना प्रोत्साहनही देऊ नका. ही चुकीची सवय आहे. त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. ऑफिसमध्ये शिस्त पाळून सर्व कामे वेळेवर पूर्ण करावीत. शिस्त माणसाला अधिक चांगले बनवते. शिस्तीशिवाय आयुष्यात यश मिळत नाही.

एकमेकांचा आदर करा

जो इतरांना आदर देतो, त्यालाच आदर मिळतो. त्यामुळे ऑफिसमध्ये कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाला योग्य तो सन्मान द्या. समोरची व्यक्ती पदाने लहान असो किंवा मोठी, तिचा आदर करा. असे केल्याने प्रत्येकजण तुमचे कौतुक करेल.

टीका आणि निंदा करण्यापासून दूर राहा

ऑफिसमध्ये इतरांची टीका किंवा निंदा करणे टाळावे. ही अतिशय वाईट सवय आहे. ही सवय शक्य तितक्या लवकर सोडून द्यावी. कारण ती तुमच्या सन्मानात आणि प्रगतीत अडथळा ठरते. जे लोक सतत इतरांची निंदा करतात, त्यांच्या मनात नकारात्मक विचार अधिक असतात. आणि नकारात्मक विचार कधीही यशाचे लक्षण नसतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)