Chanakya Niti Success Tips In Marathi : आचार्य चाणक्य यांच्या मते, यश प्रत्येकाला मिळते. फक्त यश मिळवण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. या काळात काही लोक पुढे जातात, काही मागे राहतात तर अनेक जण वेळेच्या आधीच ध्येय गाठण्यात यशस्वी ठरतात. मात्र, जे मागे राहतात त्यांना अनेकदा अपयशाला समोर जावे लागते. रात्रंदिवस कठोर परिश्रम करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशा परिस्थितीत मनात नकारात्मकतेची भावना टिकून राहते. ही भावना व्यक्तीच्या विचारांवर परिणाम करते आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे मोठे आव्हान ठरते. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुमच्यासाठी यशाचे दरवाजे बंद झाले आहेत.

आचार्य चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या शिकवतात की, अपयश आले तरीही माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. आचार्य ‘चाणक्य नीती’ नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यात मानवी जीवन, त्यातील यश, अपयश यांची सखोल चर्चा केली आहे. तर ध्येय गाठण्यापूर्वी व्यक्तीने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल आचार्य चाणक्य काय म्हणतात जाणून घेऊयात…

  • चार्य चाणक्य म्हणतात ज्याप्रमाणे शिकार मोठी असो वा लहान, सिंह नेहमीच आपल्या पूर्ण ताकदीने त्यावर झडप घालतो. त्याचप्रमाणे काम कितीही मोठे किंवा लहान असले तरीही ते पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने आपली सर्व ताकद पणाला लावली पाहिजे. ज्यामुळे यश तुमच्या पदरात नक्कीच पडेल.
  • आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येक प्राणी आपल्याला काही ना काही महत्त्वाचा जीवनधडा शिकवतो. म्हणूनच माणसाने सिंहाकडून एक गुण, बगळ्याकडून एक गुण, कोंबड्याकडून चार गुण, कावळ्याकडून पाच गुण, श्वानाकडून सहा गुण आणि गाढवाकडून तीन गुण शिकावेत. जो प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि प्राण्याकडून चांगल्या गोष्टी शिकण्याची वृत्ती ठेवतो. त्याच्या आयुष्यात यश, प्रगती आणि विकासाचा मार्ग अधिक सोपा होतो.
  • चाणक्यांच्या मते, ज्याप्रमाणे आजारपण हे जीवनातील दुःख आणि चांगली तब्येत आरोग्याचे मोठे सुख आहे. त्याचप्रमाणे यश व अपयश हे मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत. दोन्ही गोष्टी स्वीकारा आणि ध्येयांच्या दिशेने प्रयत्न करत राहा. कारण – प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असते
  • तुमचं ठरवलेलं काम किंवा योजना पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका. त्याऐवजी, ती मनात ठेवावीत आणि ती साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहावेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)