Chanakya Niti: आजच्या धावपळीच्या जीवनात सोशल मीडियावर शेकडो मित्र असणं ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. कोणाच्या पोस्टला लाईक करणं किंवा एखाद्या पार्टीला जाणं हे खूप सोपं आहे.
पण जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक एखादं मोठं संकट येतं, तेव्हा खरी परीक्षा होते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, खऱ्या मित्राची ओळख सुखाच्या काळात नाही, तर दुःखात आणि कठीण परिस्थितीत होते. चला तर मग, चाणक्य नीतीनुसार अशा कोणत्या ५ परिस्थिती आहेत, ज्यातून खऱ्या मित्राची ओळख होते, ते जाणून घेऊया.
मोठं संकट किंवा अडचण आल्यावर साथ सोडू नये
आयुष्यात संकटं कधीही सांगून येत नाहीत. अचानक नोकरी जाणं, व्यवसायात नुकसान होणं किंवा कुटुंबात एखादी दुर्घटना घडणं यामुळे माणूस पूर्णपणे खचून जातो.
अशा वेळी बहुतेक लोक हळूहळू दूर जाऊ लागतात. चाणक्य नीतीनुसार, तुमच्यावर आलेलं संकट ऐकून पळून जाण्याऐवजी जो मित्र त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मदत करतो, त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे.
वाद किंवा शत्रूमुळे संकट आल्यावर ढाल बनून उभं राहावं
जेव्हा तुमच्यासमोर एखादा मोठा वाद निर्माण होतो किंवा एखादा विरोधक तुमच्या विरोधात उभा राहतो, तेव्हा मित्रांचा खरा स्वभाव समजतो. चाणक्य सांगतात की, जो तुमच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देतो, तो खरा मित्र नसतो.
खरा मित्र तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगतो. संकटाच्या वेळी तो तुमच्या बाजूने उभा राहतो आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवून धीर देतो.
कायदेशीर अडचणी आल्यावर पाठ फिरवू नये
चाणक्य यांनी आपल्या श्लोकात ‘राजद्वार’ या शब्दाचा उल्लेख केला आहे. आजच्या काळात याचा संबंध कायदेशीर अडचणी किंवा कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांशी जोडून पाहता येतो.
अशा प्रकरणांमध्ये अनेक लोक अडचणीत पडू नये म्हणून दूर पळतात. पण कायदेशीर अडचणींच्या काळात जो मित्र योग्य सल्ला देतो आणि तुमचं मनोबल वाढवतो, तोच खरा मित्र असतो.
आर्थिक अडचणी आल्यावर मित्राचं वागणं बदलू नये
पैसा ही अशी गोष्ट आहे, जी कोणत्याही नात्याचं खरं रूप समोर आणते. जेव्हा खिशात भरपूर पैसे असतात, तेव्हा संपूर्ण जग आपल्या सोबत असल्यासारखं वाटतं.
पण आर्थिक अडचणी आल्यावर अनेक ओळखीचे लोक दूर जाऊ लागतात. चाणक्य यांच्या मते, खरा मित्र तुमची आर्थिक परिस्थिती पाहून आपलं वागणं कधीही बदलत नाही. तो आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही स्वार्थाशिवाय तुम्हाला साथ देतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
