Chanakya Niti Says Let Go of Shyness to Achieve Money and Success : तुम्ही पाहिलं असेल काही मंडळी फार लाजाळू असतात. गर्दीत जायला, दुकानदाराला एखादी गोष्ट विचारायला, फार लोकांमध्ये राहायला त्यांना विशेष आवडत नाही. बऱ्याच वेळा, यापैकी काही जणांना खरंतर लाज वाटत नाही तर संकोच वाटतो. पण, आचार्य चाणक्य (चाणक्य नीती) यांनी नीती ग्रंथामध्ये सल्ला दिला की, व्यक्तीने जीवनातील काही गोष्टी करताना संकोच बाळगू नये, अन्यथा ती व्यक्ती मागे पडेल.

यश मिळणार नाही

कधीकधी, एखादी व्यक्ती बरोबर असूनही, संकोचामुळे ती आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की, इतरांसमोर आपले विचार व्यक्त करताना कधीही संकोच बाळगू नये. त्याचप्रमाणे, जर कोणी चुकीचे असेल, तर त्याची चूक त्याला दाखवून द्यावी. कारण – जो व्यक्ती आपले विचार व्यक्त करण्यास संकोच करतो, त्याला जीवनात कधीही यश मिळत नाही.

जेवताना संकोच करू नका

आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यक्तीने जेवताना कधीही संकोच बाळगू नये. जो व्यक्ती जेवताना संकोच करतो, त्याचे पोट कधीच भरत नाही आणि तो उपाशीच राहतो. कारण – जेव्हा एखाद्या व्यक्तीचे पोट भरलेले असते, तेव्हाच तो कोणतेही काम व्यवस्थित करू शकतो. एवढेच नाही, तर भुकेमुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कमी होते. म्हणून, चाणक्याच्या तत्त्वानुसार, जेवण्याची कधीही लाज बाळगू नका.

पैशांची कमतरता राहील कायम

कधीकधी, लोक स्वतःचेच पैसे परत घेण्यास संकोच करतात. चाणक्याच्या मते, पैशांच्या व्यवहारांची कधीही लाज बाळगू नये. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मागण्यात काहीही लाज नाही. जर तुम्ही असे केले, तर तुम्ही पैसे गमावून बसाल.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)