These People Will Never Understand Your Pain : अर्थशास्त्राव्यतिरिक्त, आचार्य चाणक्यांनी मानवी जीवनाच्या फायद्यासाठी इतर अनेक ग्रंथ लिहिले. चाणक्यांनी आपले ज्ञान आणि अनुभव ‘चाणक्य नीती’ नावाच्या नीतीशास्त्रावरील ग्रंथात लिहिले आहेत. चाणक्य नीतीच्या या ग्रंथात मानवी जीवनाविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्यांचा असा विश्वास आहे की, आजही जर या तत्त्वांचे आपल्या जीवनात योग्य प्रकारे पालन केले, तर अनेक समस्या टाळता येतात. इतकेच नाही, तर आपल्या नीतीशास्त्रात चाणक्यांनी अशा काही लोकांचाही उल्लेख केला आहे, ज्यांना नेहमी टाळले पाहिजे, कारण अशा लोकांना कोणाचेही दुःख कधीच समजत नाही. चाणक्य नीतीनुसार, चला अशा लोकांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्यापासून दूर राहणे सर्वोत्तम आहे.

व्यसनी

चाणक्य नीतीनुसार, जे लोक अमली पदार्थांचे व्यसन करता त्यांच्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. कारण – ते नेहमी पैशाच्या शोधात असतात. अशी माणसं पैशासाठी चुकीची कामे करण्यात नेहमी तयार असतात. अशा लोकांच्या संगतीत राहिल्यास आपणही हळूहळू त्यांच्यासारखे वागू लागतो. नाहीतर त्यांच्या चुकीच्या कृत्यांचे परिणाम किंवा किंमत आपल्यालाही मोजावी लागू शकते.

स्वार्थी

आचार्य चाणक्य यांच्या मते, स्वार्थी मंडळी व्यक्ती नेहमी स्वतःचाच विचार करतात. अशी व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाचा कधीच विचार करत नाही. म्हणून, अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. जेणेकरून तुम्हाला वाईट वाटणार नाही.

चोर

चाणक्य नीतीनुसार, ज्या लोकांचा एकमेव हेतू चोरी करणे हा असतो, त्यांच्यापासून नेहमी दूर राहावे. चोरांना दुसऱ्याचे दुःख आणि वेदना कधीच समजत नाहीत. या चोरीमुळे कोणाचे किती नुकसान होईल, हे त्यांना कळत नाही. त्यांचे लक्ष फक्त त्यांच्या चोरीवर केंद्रित असते. चोरट्या स्वभावाच्या व्यक्तीला कोणाच्याही परिस्थितीची किंवा दुःखाची पर्वा नसते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)