Chanakya Niti: या संसारात जन्माला आलेला प्रत्येक माणूस पैसा, पद आणि मान-सन्मान मिळवण्याची इच्छा ठेवतो. लोकांमध्ये स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी माणूस आयुष्यभर मेहनत करतो. पण यश मिळवण्याच्या नादात तो अनेकदा चुकीचा मार्ग निवडतो आणि स्वतःचं सर्व काही पणाला लावतो.

यश मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीचा आधार घेऊ नये, नाहीतर वर्तमानासोबत भविष्यही अंधारात जाईल, हे चाणक्यांनी सांगितले आहे. चला जाणून घेऊया, चाणक्यांनी कोणत्या गोष्टीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

‘खोट्याला कधीच भविष्य नसतं. ते आज थोडा आनंद देईल, पण उद्या मोठं नुकसान करून जाईल.’ – आचार्य चाणक्य

सत्याचा मार्ग कठीण असतो, पण जो माणूस नेहमी सत्याची साथ देतो त्याला शेवटी यश नक्की मिळतं. उलट खोट्याचा आधार घेणारा माणूस काही काळासाठी आनंदी राहू शकतो. पण खोटं बोलण्याची सवय लागली तर त्याचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही धोक्यात येतं आणि त्याला खऱ्या अर्थाने यश मिळत नाही.

एखादी गोष्ट पटकन मिळवण्यासाठी अनेकजण शॉर्टकटचा मार्ग निवडतात. एक खोटं लपवण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा खोटं बोलावं लागतं आणि शेवटी ते त्याच खोट्याच्या जाळ्यात अडकतात. अशा लोकांची प्रतिमा खराब होते. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडतो आणि आयुष्यभर कमावलेला मान-सन्मानही गमवावा लागतो.

खोट्यावर उभे असलेले नातेसंबंध फार काळ टिकत नाहीत. काही काळ ते आनंद देतात, पण शेवटी त्यांचा शेवट वाईटच होतो. खोटं कितीही हुशारीने बोललं तरी ते जास्त काळ लपून राहत नाही. स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी खोटं आणि फसवणूक यांचा आधार घेणारे लोक शेवटी अपयशीच ठरतात. कारण जेव्हा त्यांचं खोटं उघड होतं, तेव्हा सर्व काही हातातून निसटलेलं असतं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)