3 Things to Focus on for Success in Life : आचार्य चाणक्य हे देशातील महान सल्लागारांपैकी एक मानले जातात. त्यांच्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठीचे उपाय आहेत. चाणक्यांनी ‘चाणक्य नीती’ नावाचा एक महान ग्रंथही लिहिला. या नीतीशास्त्राच्या ग्रंथाचा अभ्यास केल्याने केवळ समस्याच सुटत नाहीत, तर जीवन जगण्याचा योग्य मार्ग समजण्यासही मदत होते.
चाणक्य नीतीमध्ये जीवन जगताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबद्दलही सांगितले आहे. अनेकदा यश मिळवण्याच्या प्रवासात आपण स्वतःकडे लक्ष देणे सोडतो. स्वतःवर होणारा अन्याय किंवा अपमान दुर्लक्षित करतो. इतरांना पुढे जाताना पाहून स्वतःवर काम करणे थांबवतो किंवा ‘आता मी कोणतीही योजना आखणार नाही,’ असा विचार करून प्रयत्न करणेच सोडून देतो. पण अशा वेळी खचून न जाता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.
अपमान
आदर हा एक असा शब्द आहे जो अनेकदा वापरला जातो. त्यामुळे कोणीही स्वतःवर झालेल्या अपमानाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर कोणी तुमचा अपमान केला, तर नेहमी त्यांच्यापासून अंतर ठेवा. कारण – वारंवार अपमान सहन केल्याने समाजात तुमचा दर्जा कमी होतो आणि तुमची प्रतिमाही डागाळते. म्हणून, आयुष्यात कोणीही अपमान कधीही सहन करू नये.
आत्म-सुधारणा
आयुष्यात पुढे जाण्यासाठी, सर्वप्रथम स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे केवळ वैयक्तिक विकासालाच चालना मिळत नाही. तर नकारात्मकता देखील दूर होते आणि यश मिळवण्याची जिद्द देखील दुप्पट होते.
रणनीती तयार करा
काम कोणतेही असो ‘प्लॅन’ तयार केलाच पाहिजे. त्यामुळे पुढे काय करायचं, काय करायचं नाही, कुठे थांबायचं यावर नेहमीच नियंत्रण ठेवता येते आणि असे प्लॅन तुमच्या वाईट काळातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.
