Chanakya Niti Parenting Tips : चाणक्य नीती माणसाला नेहमी योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये मुलांना योग्य दिशा, यश आणि चांगल्या संस्कारांचे महत्त्व पटवून दिले आहे. असे मानले जाते की, चाणक्य नीतीमधील या विशेष गोष्टी मुलांना शिकवल्यास ते आयुष्यात यशस्वी होतात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडतात.

म्हणूनच, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना चाणक्य नीतीतील या महत्त्वाच्या गोष्टी नक्की सांगितल्या पाहिजेत. यामुळे पाल्याला समाजात मान-सन्मान आणि यश प्राप्त होते. जर तुमचंही मुल चुकीच्या मार्गावर जात असेल तर चाणक्य नीतीच्या काही प्रमुख गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊया:

१. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजवा

मुले मनाने निष्पाप असतात, पण ती खोडकरही असतात. लहानपणी त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे समजत नाही, त्यामुळे ती जास्त खोड्या करतात. यामुळे घरातील लोक वैतागून त्यांना रागावतात किंवा कठोर शिक्षा करतात. चाणक्य नीतीनुसार, लहान मुलांना प्रेमाने काय योग्य आणि काय अयोग्य हे नक्की समजावून सांगितले पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडून पुन्हा चुका होणार नाहीत.

२. चांगले संस्कार

आजच्या काळात तीच मुले श्रेष्ठ मानली जातात, ज्यांच्यावर चांगले संस्कार असतात. चाणक्य नीतीनुसार, ज्या मुलांमध्ये मोठ्यांचा आदर करणे, शिस्त पाळणे आणि कुटुंबाप्रती जबाबदारीची जाणीव असते, ती मुले आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करतात. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला चांगले संस्कार दिले पाहिजेत, जेणेकरून समाजात त्यांचे कौतुक होईल.

३. योग्य सांगत असणे आवश्यक

चाणक्यांचे असे मानणे होते की, मूल जशा संगतीत राहील, तसेच ते घडते. म्हणूनच पालकांनी आपल्या पाल्याला वाईट संगतीत पडण्यापासून रोखले पाहिजे. मूल वाईट संगतीत पडल्यास त्याचे भविष्य उद्ध्वस्त होऊ शकते, त्यामुळे मुलांसाठी योग्य मित्र आणि सांगत निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

४. अपयशाला न घाबरणे

चाणक्यांनी आपल्या नीतीत सांगितले आहे की, कठोर परिश्रमांमुळे मुलांना योग्य मार्ग मिळतो आणि करिअरमध्ये मोठी प्रगती होते. मुलांना स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि स्वावलंबी बनणे नक्की शिकवा. यामुळे मुले आयुष्यात कधीही निराश होणार नाहीत.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)