4 Things You Should Never ignored in life : आचार्य चाणक्य यांच्या अनुभवातून आणि दूरदृष्टीतून चाणक्य नीतीसारख्या ग्रंथाचा जन्म झाला. आचार्य चाणक्यांनी नीतीमध्ये लिहिलेल्या अनेक गोष्टी योग्य मार्ग दाखवू शकते. आचार्य चाणक्य नीतीमध्ये सांगतात की, जीवनातील यश केवळ कठोर परिश्रमाने मिळत नाही तर योग्य वेळेला योग्य गोष्टी केल्यानेही मिळते. आचार्य चाणक्यांनी अशा तीन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागते. अशा परिस्थितीत, चाणक्य नीतीनुसार कोणत्या ३ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये याबद्दल जाणून घेऊयात…

चाणक्य नीतीचा श्लोक काय सांगतो?

वेळेचे महत्त्व स्पष्ट करताना, आचार्य चाणक्यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध श्लोकात म्हटले आहे. “कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः, कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः”. म्हणजे वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. सर्वजण झोपलेले असतानाही वेळ जागी असते आणि सतत पुढे जात असते. वेळेच्या गतीवर कोणीही मात करू शकत नाही. त्यामुळे जो कोणी वेळेला हलक्यात घेतो. तो स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे बंद करून घेतो.

वेळेचे महत्त्व ओळखा

चाणक्याच्या मते, भूतकाळ कधीही परत येत नाही. वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. अनेकदा, लोक आळसाच्या आहारी जाऊन महत्त्वाची कामे उद्यावर ढकलतात. पण, उद्या कधीच येत नाही. जे वेळेचा आदर करतात आणि प्रत्येक कार्य निर्धारित वेळेत पूर्ण करतात. यश त्यांच्या मागे धावून येते. वेळेचा गैरवापर करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

ज्ञान आणि शिक्षण

ज्ञान आणि शिक्षण अशा दोन गोष्टी आहेत, ज्या कोणालाही, कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकतात. शहाण्या माणसाचा सर्वत्र आदर केला जातो. अनेक लोक शिक्षण पूर्ण झाल्यावर शिकणे थांबवतात किंवा नवीन ज्ञान मिळवण्याच्या गरजेला कमी लेखतात. पण, चाणक्याच्या मते, शिकणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींना कमी लेखणारे स्पर्धेच्या शर्यतीत खूप मागे पडतात. माणसाचे खरे सामर्थ्य त्याच्या संपत्तीत नसून त्याच्या बुद्धी आणि ज्ञानात असते हे नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत.

नात्यांचे महत्त्व

माणूस आणि त्याचे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक हे त्याच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. आजच्या वेगवान जीवनात, लोक करिअर, पैशाच्या मागे धावताना आपल्या प्रियजनांना वेळ द्यायला विसरतात. पण, नात्यांना कधीही गृहीत धरू नये. जो माणूस आपल्या कुटुंबाचे आणि खऱ्या मित्रांचे महत्त्व समजत नाही, तो यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही एकटा राहतो. त्यामुळे प्रियजनांवर प्रेम करणे आणि त्यांना वेळ देणे ही सुखी जीवनासाठी एक आवश्यक अट आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.