Habits That Make You a Skilled and Intelligent Person : आचार्य चाणक्य महान रणनीतिकार आणि विद्वान मानले जातात. त्यांनी आपल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान आणि विचार चाणक्य नीतीमध्ये मांडले आहेत. त्यांच्या अनेक शिकवणी आजही जीवनात उपयुक्त ठरू शकतात. या विचारांचा योग्य पद्धतीने अवलंब केल्यास व्यक्तीला यशस्वी होण्यास मदत मिळू शकते. आचार्य चाणक्यांनी कोणत्या व्यक्ती कुशल आणि बुद्धिमान असतात याबद्दलही सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया…
गुणांची देवाणघेवाण
चाणक्य नीतीनुसार, एखादी व्यक्ती कुशल आणि सक्षम तेव्हाच मानली जाते, जेव्हा ती आपल्या मुलामुलींचे लग्न चांगल्या कुटुंबात लावून देते. यामुळे एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे गुणांची देवाणघेवाण होते, ज्यामुळे दोन्ही कुटुंबे अगदी आनंदात राहतात.
शिक्षण आणि संस्कार
आचार्य चाणक्य म्हणतात, जो व्यक्ती आपल्या मुलांना चांगले शिक्षण व योग्य संस्कार देतो, त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. चांगले शिक्षण मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरते आणि त्यांना नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यास मदत करते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करणेही तितकेच महत्वाचे आहे.
योग्य सल्ला
चाणक्यांनुसार, जो व्यक्ती आपल्या मित्रांना नेहमी योग्य सल्ला देतो, तो कुशल आणि सक्षम असतो. जो मित्र दुसऱ्या मित्राला कठीण काळात आणि संघर्षात मदत करतो, तो सगळ्यांचा आदर मिळवतो.
विचारपूर्वक वागणे
आचार्य चाणक्यांच्या मते, शत्रूचा सामना करताना केवळ द्वेष किंवा राग करून चालत नाही. शत्रूच्या हालचाली आणि विचारांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. आपल्या बुद्धीने, योग्य शब्दांनी आणि विचारपूर्वक वागून समोरच्या व्यक्तीला आपल्या योजनांमध्ये गुंतवून ठेवावे, जेणेकरून तो तुमच्याविरोधात कट रचण्याची संधी शोधू शकणार नाही.
आत्मविश्वास
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तिचा आत्मविश्वास. आत्मविश्वास असल्यास तुमचा कोणताही प्रयत्न कधीही अपयशी होत नाही आणि अत्यंत कठीण परिस्थितीलाही तुम्ही अगदी सहज सामोरे जाऊ शकता.
ज्ञान
तुम्ही मिळवलेले ज्ञान कधीही वाया जात नाही, मग ते पुस्तकी ज्ञान असो किंवा प्रत्यक्ष कामातून मिळालेला अनुभव असो. एक ना एक दिवस हा अनुभव उपयोगी पडतो.
पैसा
आयुष्यात पैशाची गरज नेहमीच लागते. कारण – चांगले-वाईट दिवस येत-जात असतात. त्यामुळे, आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुमच्याकडे नेहमी अतिरिक्त पैसा असला पाहिजे. कठीण काळात सुद्धा हे आवश्यक आहे.
