Want to Stay Happy and Satisfied in Life : आचार्य चाणक्य त्यांच्या ‘नीतिशास्त्र’ आणि ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विचारांचे अनुसरण करून, कोणीही यश मिळवू शकतो. प्राचीन काळी, चंद्रगुप्त मौर्याने आचार्य चाणक्यांची शिकवण आत्मसात करून मौर्य वंशाची स्थापना केली. तर आचार्य चाणक्यांनी त्यांच्या ‘नीतिशास्त्र’ या ग्रंथात, आपले जीवन समृद्ध कसे करावे याबद्दल सांगितले आहे. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात आनंदी आणि समाधानी राहायचे असेल, तर या शिकवणींचा नक्कीच अवलंब करा.
काय सांगते चाणक्य नीती चला बघू…
संयम
जर तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवला. तर कोणीही तुम्हाला किंचितही इजा करू शकत नाही.
सेवा
जर तुम्हाला जीवनात स्वर्गासारखा सुख अनुभवायचा असेल. तर आपल्या आई-वडिलांची निष्ठेने सेवा करा. तुम्हाला मंदिरात जाण्याचीही गरज भासणार नाही.
दुःख
मागील जन्मातील कर्मांमुळे माणसाला दुःख भोगावे लागते, अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र, मंत्रोच्चार आणि आध्यात्मिक साधनेमुळे हे दुःख कमी होण्यास मदत होऊ शकते, असेही मानले जाते.
राग
रागात केलेलं काम कितीही मेहनतीने केले तरीही ते वायाच जाते. म्हणून रागावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण – रागामध्ये सर्व सद्गुण नष्ट करण्याची शक्ती असते. रागावण्याऐवजी त्या गोष्टीवर एकदा विचार करून बघा.
काम, क्रोध आणि लोभ
काम, क्रोध आणि लोभ यांसारख्या विकारांनी ग्रासलेली व्यक्ती सतत दुःखी राहते. अशा परिस्थितीत दुःखातून बाहेर पडण्याची इच्छा असूनही व्यक्तीला अडचणींवर मात करणे कठीण जाते.
वेळ
एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या कामाकडे किंवा कृतींकडे सतत लक्ष देण्यात तुमचा मौल्यवान वेळ वाया जातो. जीवन हे कर्म करण्यासाठी मिळाले आहे, त्यामुळे इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
