Never share your five secrets with anybody : प्रत्येक व्यक्तीचा एक खास मित्र किंवा जवळचा मित्र असतो, ज्याच्याबरोबर तो आपल्या मनातील सर्व गोष्टी शेअर करतो. पण, कधीकधी, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की, तुम्ही शेअर केलेल्या गोष्टी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि तिथून तिसऱ्या व्यक्तीकडे पोहचतात. पण, चाणक्याच्या मते, सर्व काही शेअर करणे योग्य नाही. माणसाच्या आयुष्यात अशा पाच गोष्टी आहेत ज्या गुप्त ठेवणेच खूप महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत…
आर्थिक परिस्थिती
तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कोणालाही कधीही सांगू नये. तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्हाला कधी आर्थिक नुकसान झाले असेल तर त्याबद्दल शेअर करू नका. मानसशास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही इतरांना तुमच्या आर्थिक नुकसानीबद्दल सांगता. तेव्हा लोक तुम्हाला मदत करण्याऐवजी तुमच्यापासून दूर जातात. याउलट, जर तुमच्याकडे खूप पैसे असतील आणि तुम्ही ही गोष्ट इतरांना सांगितली, तर तुम्ही नकळतपणे शत्रूंना आमंत्रण देता.
भांडण
पती-पत्नीमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडण होतात. पण, भांडण म्हणा किंवा मतभेद इतर कोणालाही सांगू नयेत. चाणक्य म्हणतात की, स्त्री असत किंवा पुरुष आपल्या कौटुंबिक बाबी किंवा आपले मतभेद इतरांशी बोलतो. तेव्हा तो स्वतःचा आत्मसन्मान नष्ट करत असतो. मानसशास्त्रानुसार, कौटुंबिक बाबी उघडपणे सांगितल्याने लोक वरवर तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवतील. पण, तुमच्या पाठीमागे तुमची थट्टा करतील एवढं तर नक्की…
कमीपणा
प्रत्येकामध्ये एखाद्या गोष्टीची कमी असते. पण, ती कोणालाही कधीही सांगू नका. तुमची कमजोरी जाणून तुमचे शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करू शकतात. जर तुम्ही तुमची कमजोरी तुमच्या अगदी जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगितली तर भविष्यात तुमचे त्यांच्याशी मतभेद झाल्यास ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.
भविष्यातील योजना
जर तुम्ही भविष्यात काहीतरी मोठे करण्याची योजना आखत असाल – जसे की नवीन व्यवसाय सुरू करणे, मालमत्ता खरेदी करणे. तर त्याबद्दल कोणालाही सांगू नका. तुमचे काम पूर्ण होईपर्यंत कोणासमोरही त्याचा उल्लेख करू नका. जर तुम्ही तुमच्या योजना आधीच जाहीर केल्या, तर कोणीतरी तुमच्या प्रगतीत नक्कीच अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार एवढं तर नक्की.
अपमान किंवा विश्वासघात
जर कोणी तुमचा अपमान केला असेल किंवा तुमचा विश्वासघात केला असेल. तर तो कोणालाही सांगू नका. मानसशास्त्रानुसार, तुमचा अपमान किंवा विश्वासघात झाल्याचे कळल्यावर समाज तुम्हाला कमकुवत किंवा असहाय्य समजू लागतो, ज्यामुळे प्रत्येकजण तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ लागतो.
