Reasons You Don’t Find Peace in Life : आचार्य चाणक्या त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि सुशिक्षित व्यक्तींपैकी एक मानले जात होते. आचार्य चाणक्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक पुस्तकांमध्ये मानवतेच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. असे म्हटले जाते की, जर एखाद्या व्यक्तीला यशस्वी आणि समृद्ध जीवन जगायचे असेल, तर त्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे. आचार्य चाणक्यांनी काही चुकांचाही उल्लेख केला आहे आणि म्हटले आहे की, जो कोणी या चुका करतो तो आयुष्यात कधीही सुखी होणार नाही. या चुका आयुष्यभराच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. तर त्याचबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊयात…
- आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या घरात पूजा केली जात नाही किंवा देवाचे नाव घेतले जात नाही. अशा घरांमध्ये राहणारे लोक नेहमी दुःखी असतात, त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते आणि या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
- चाणक्य नीतीनुसार जी मंडळी स्त्रियांना वाईट वागणूक देतात, त्यांचा आदर करत नाहीत; त्या व्यक्ती सुखी जीवन जगू शकत नाही. असं प्रत्येक वेळी असे केल्याने तुमच्या प्रगतीला अडथळा येतो. ज्या कुटुंबांमध्ये स्त्रियांचा आदर केला जात नाही, त्यांची कधीही प्रगती होत नाही. कारण – देवी लक्ष्मी अशा घरांमध्ये कधीही वास करत नाही.
- नीती ग्रंथात म्हंटलंय, ज्या घरांमध्ये वडीलधाऱ्या माणसांशी आणि मुलांशी गैरवर्तन केले जाते. त्या घरांमध्ये नेहमीच अशांततेचा धोका असतो. अशा घरांमध्ये राहणारे लोक आपले पैसे सुरक्षित ठेवू शकत नाहीत. त्यांना अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. या घरांमध्ये अनेकदा नकारात्मक ऊर्जेचा वावर असतो.
म्हणूनच आचार्य चाणक्य सांगतात की, ही तत्त्वे आयुष्यात अंगीकारल्यास अनेक अडचणी आणि चिंतांपासून मुक्ती मिळू शकते. विशेषतः दुसऱ्यांच्या संपत्तीवर कधीही डोळा ठेवू नका. जे लोक हा नियम पाळतात, ते आयुष्यात अधिक समाधानी राहतात आणि अनेक चिंता व मानसिक तणावापासून दूर राहतात.
