Staying In Balance By Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या नीतीशास्त्राच्या ग्रंथातील गोष्टी लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी नीती ग्रंथात मानवी जीवनाच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा केली आहे. आचार्य चाणक्यांनी नातेसंबंध, मैत्री, शत्रू, संपत्ती, नोकरी आणि व्यवसाय यांसारख्या जीवनाशी संबंधित विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत आणि सुखी जीवनाची अनेक रहस्ये उघड केली आहेत. त्यांनी लोकांच्या सुख किंवा दुःखास कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक गोष्टींचाही उल्लेख केला आहे. त्यापैकी एक म्हणजे कोणाच्या

आचार्य चाणक्यांच्या मते, काही लोकांपासून खूप दूर राहू नये आणि त्यांच्या खूप जवळही जाऊ नये. कारण अशा लोकांशी असलेली मैत्री आणि वैर, दोन्ही धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींशी नेहमी संतुलित संबंध ठेवणे योग्य ठरते. चला तर मग, जाणून घेऊया कोणत्या लोकांशी अंतर राखून संतुलित संबंध ठेवले पाहिजेत…

राजा

राजासारख्या हुशार व ताकद असणाऱ्या लोकांच्या खूप जवळही राहू नये आणि खूप दूरही जाऊ नये. याचे कारण असे की, एखाद्या ताकदवान व्यक्तीच्या खूप जवळ गेल्याने तुम्हाला त्यांच्या वर्चस्वाखाली काम करण्यास भाग पाडले जाऊ शकते. तर खूप जास्त अंतर ठेवल्यास त्याच्याकडून मिळणाऱ्या विशेषाधिकारांपासून तुम्ही वंचित राहू शकता. म्हणून अशा लोकांशी नेहमी संतुलित संबंध ठेवणे महत्त्वाचे आहे.

आग

आगीपासून योग्य अंतरावर उभे राहिल्यास ऊब मिळू शकते तर खूप जवळ गेल्यास तुम्ही जळून खास सुद्धा होऊ शकता . म्हणून, आचार्य चाणक्य म्हणतात की आगीपासून खूप जास्त अंतरही ठेवू नये आणि खूप जवळही जाऊ नये.

स्त्री

स्त्रियांना कधीही दुर्बळ समजू नये. समाजात स्त्रिया पुरुषांप्रमाणेच महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, कोणत्याही व्यक्तीच्या अतिशय जवळ जाणे किंवा पूर्णपणे दूर राहणे, दोन्हीही अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे स्त्रियांशी नेहमी आदर, संयम आणि योग्य मर्यादा राखून संतुलित संबंध ठेवावेत.

स्वार्थी आणि लोभी

चाणक्य नीतीनुसार, स्वार्थी आणि लोभी लोकांपासून नेहमी सावध राहिले पाहिजे; अशी माणसं फक्त स्वतःच्या हिताचा विचार करतात. शिवाय, स्वार्थी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्यामुळे अशी मंडळी फायद्यासाठी कोणालाही फसवू शकतात. त्याचबरोबर तोंडावर गोड पण पाठीमागे तुमच्याविरुद्ध कट रचणाऱ्या आणि तुम्हाला इजा पोहोचवण्याचा लोकांपासून शक्यतो दूर राहा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)