Chanakya Niti Morning Routine : आचार्य चाणक्य हे भारतातील महान विद्वानांपैकी एक होते. मानवतेच्या कल्याणासाठी, चाणक्यांनी ‘चाणक्य नीती’ ग्रंथ लिहिला, ज्यात त्यांनी जीवनाच्या सर्व पैलूंवर सविस्तर लिहिले आहे. त्यांनी राजकारण, युद्ध आणि लोकांबरोबर संतुलन राखण्यावरही मार्गदर्शन केले आहे. आजही संकटाच्या काळात चाणक्य नीतीचे पालन केले जाते. जर एखादी व्यक्ती त्यांच्या तत्त्वांचे पालन करत असेल. तर ती जीवनातील आव्हाने टाळू शकते आणि समाधानी व यशस्वी जीवन जगू शकते. इतकेच नाही, तर त्यांच्या नीती ग्रंथात त्यांनी काही विशिष्ट कामांचाही उल्लेख केला आहे, जी व्यक्तीने दररोज सकाळी उठल्यावर केली पाहिजेत. असे केल्याने व्यक्ती जीवनात नेहमीच उच्च शिखरे गाठते. चला, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

लवकर उठा

आचार्य चाणक्यांनुसार, जर तुम्हाला प्रगती करायची असेल, तर तुम्ही सकाळी लवकर उठले पाहिजे. लवकर उठल्याने तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आचार्य चाणक्यांनुसार, जो ब्रह्ममुहूर्तावर उठतो, तो नेहमी प्रगती साधतो.

मेहनत

जीवनात यश मिळवण्यासाठी, व्यक्तीने नेहमी कठोर परिश्रम केले पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, जो व्यक्ती कठोर परिश्रमांना घाबरत नाही, त्याला पैशाची कधीच कमतरता भासत नाही. म्हणून, व्यक्तीने दररोज सकाळी लवकर उठून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

आळस

आळस हा जीवनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर एखादी व्यक्ती हुशार असेल पण तिच्या मनात आळस दडलेला असेल, तर तिचे कौशल्य निरुपयोगी ठरते. आचार्य चाणक्यांनुसार, व्यक्तीने जीवनात आळस सोडला पाहिजे. तरच यशाचा मार्ग खुला होईल.

सूर्यदेवाला जलार्पण

आचार्य चाणक्यांनुसार, व्यक्तीने दररोज सूर्यदेवाला जलार्पण केले पाहिजे. असे केल्याने जीवनात प्रगतीच्या संधी निर्माण होतात आणि सूर्यदेव प्रसन्न होतात. यानंतर, व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिवाय, व्यक्तीने आपल्या ध्येयाबद्दल कोणालाही सांगू नये. असे केल्याने अपेक्षित परिणाम मिळण्यापासून अडथळा येतो.

व्यायाम

आचार्य चाणक्यांच्या मते, सकाळी उठून ध्यान, योग आणि व्यायाम केला पाहिजे. कारण निरोगी असाल तरच तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल सकारात्मक राहू शकता.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)