How to Control Anger : एकदा चंद्रगुप्ताने आचार्य चाणक्यांना विचारले, “गुरुदेव, मी रणांगणावर माझ्या शत्रूंना पराभूत करू शकतो; पण माझ्या मनात निर्माण होणाऱ्या रागावर मात्र नियंत्रण ठेवू शकत नाही. क्षुल्लक गोष्टींवरूनही माझं मन भडकतं. त्या क्षणी मी काय बोलतोय आणि माझ्यासमोर कोण आहे, याचाही मला विसर पडतो. नंतर माझा राग शांत झाल्यावर मला मी म्हंटलेल्या शब्दांचा पश्चात्ताप होतो; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.” यावर आचार्य चाणक्य म्हणाले, “चंद्रगुप्ता, राग ही अशी आग आहे जी ज्या मनात निर्माण होते, त्या मनालाच सर्वप्रथम जाळते. पण जर तू रागच स्वरूप आणि त्याचे परिणाम समजून घेतलेस, तर त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकतोस.”

तर राग ही अशी भावना आहे, जी एका क्षणात तुमचं नातं, विश्वास आणि मिळवलेलं सगळं काही हिरावून घेऊ शकते. आचार्य चाणक्यांच्या मते, “हेच जीवनाचे सत्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती रागाच्या भरात दुसऱ्याला वाईट शब्द बोलते. मग नंतर माफी मागते. पण, समोरच्या माणसाच्या हृदयावर झालेल्या शब्दांच्या जखमा पूर्णपणे भरत नाहीत. याचा अर्थ असा की, खरा विजय इतरांना हरवण्यात नसून, स्वतःवर नियंत्रण मिळवण्यात आहे. चला तर मग आज चाणक्य नीतीमधून आपल्या रागावर नियंत्रण कसे ठेवावे याबद्दल शिकूया.

चाणक्य नीतीतून शिका रागावर कसं ठेवावं नियंत्रण

१. स्वतःला करा शांत

राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. एक दीर्घ श्वास घ्या, काही वेळ शांत रहा किंवा त्या परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवा.

२. शब्दांवर ठेवा नियंत्रण

रागाच्या भरात बोललेले शब्द कधीही मागे घेता येत नाहीत. त्यामुळे बोलण्यापूर्वी खरंच शब्द आवश्यक आहेत की, नाही याचा विचार करा.

३. समस्येवर करा लक्ष केंद्रित

प्रत्येक प्रतिक्रियेमागे एक कारण असते. व्यक्तीला नव्हे, तर तिच्या वागणुकीला समजून घ्या.

४. रागाचे होते ऊर्जेत रूपांतर

रागाला प्रेरणेत रूपांतरित करा आणि त्याच ऊर्जेचा उपयोग परिश्रम, ध्येयपूर्ती आणि यश मिळवण्यासाठी करा.

५. योग्य वेळी योग्य निर्णय

रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. त्यामुळे डोकं शांत झाल्यावरच निर्णय घ्या.

राग येण्याचे तोटे

  • मानसिक अस्वस्थता आणि तणाव
  • नातेसंबंधांमध्ये दुरावा
  • आरोग्याच्या समस्या
  • चुकीचे निर्णय
  • आदर आणि विश्वासार्हतेचे नुकसान

यातून तुम्ही काय शिकावं?

चाणक्य नीतीनुसार, “जो मनुष्य आपल्या रागावर विजय मिळवतो, तो स्वतःच्या नशिबाचा मालक बनतो. राग तुमचा गुलाम असावा, तुम्ही त्याचे गुलाम नसावे.”