Chanakya Niti on Success : आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ नव्हते, तर ते जीवनातील सत्य आणि धर्माचे कठोर समर्थक होते. त्यांनी ‘चाणक्य नीती’ या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात राजकारण, युद्धनीती, अर्थकारण तसेच जीवनातील विविध पैलूंवर भाष्य करत व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करणारी अनेक तत्त्वे सांगितली आहेत.
त्यांच्या ‘चाणक्य नीती’ मध्ये त्यांनी केवळ जीवन सुधारण्यासाठी सूचनाच दिल्या नाहीत. तर माणसाला समस्यांनी ग्रासणाऱ्या सवयींवरही भाष्य केले आहे. त्यांचा असा विश्वास होता की, यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, इतरांकडून अनेक गोष्टी शिकत पुढे गेलं पाहिजे. तर तुम्हाला अगदी मनासारखे यश मिळेल.
कृती आणि ज्ञान
चाणक्य म्हणतात की, ज्याप्रमाणे पक्षी आपल्या दोन पंखांनी उडतो, त्याचप्रमाणे व्यक्ती कृती आणि ज्ञानाच्या माध्यमातून यश मिळवू शकते. म्हणून, व्यक्तीने आपली कृती आणि ज्ञान नेहमी योग्य दिशेने ठेवले पाहिजे.
आदर आणि साधनसंपत्ती
आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या ठिकाणी आदर मिळत नाही. तिथे राहण्यात काहीही अर्थ नाही. तसेच, जिथे उपजीविकेचे साधन उपलब्ध नाही किंवा ज्ञान आणि शिकण्याची संधी मिळत नाही, अशी जागा बुद्धिमान व्यक्तीने तात्काळ सोडून द्यावी. कारण योग्य वातावरण आणि सतत शिकण्याची संधी ही व्यक्तीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते.
सत्य बोला आणि पैसे योग्य ठिकाणी खर्च करा
सुखी व यशस्वी जीवनासाठी नेहमी सत्य बोला, शहाणपणाने खर्च करा आणि नकारात्मक विचार टाळा. अशी मंडळी केवळ सुखीच नसतात. तर त्यांना हुशारही मानले जाते.
शत्रू आणि मित्र
चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की, शक्तिशाली शत्रू आणि दुर्बळ मित्र हे दोघेही दुःखाचे कारण ठरू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून नेहमी सावध राहणे आणि कोणावरही विचार न करता पूर्णपणे अवलंबून न राहणे महत्त्वाचे आहे.
भूक आणि बुद्धिमत्ता
चाणक्यांच्या मते, बुद्धिमान व्यक्तीने जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे. भुकेमुळे चिडचिडेपणा वाढू शकतो आणि एकाग्रतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. भुकेच्या अवस्थेत घेतलेले निर्णय किंवा केलेले वर्तन व्यक्तीच्या प्रतिमेवरही नकारात्मक परिणाम करू शकते.
