Secret to a Peaceful Life by chanakya niti : आचार्य चाणक्य जगातील महान विद्वानांपैकी एक मानले जातात. त्यांची चाणक्य नीती अनेक दशकांपासून सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्यात राजकारण, अर्थशास्त्र आणि जीवनातील इतर महत्त्वाच्या समस्यांसह विविध विषयांचा समावेश आहे. त्यांच्या चाणक्य नीतीद्वारे अनेक उदाहरणे दिली आहेत, जी एखाद्या व्यक्तीने आपले जीवन कसे जगावे याबद्दलची माहिती देतात.

वनस्पती, प्राणी आणि पर्वत यांसारख्या निसर्गातील उदाहरणांचा वापर करून त्यांनी माणसांना महत्वाचा सल्ले दिले आहेत. जर एखादी व्यक्ती जी योग्य मार्गापासून भरकटली आहे. तिने या शिकवणींचा अवलंब केल्यास, ती यश मिळवू शकते. चाणक्य नीतीच्या या भागात, पर्वत आणि महासागर एखाद्या व्यक्तीला यश कसे मिळवायचे याबद्दल शिकवतात तर त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…

प्रलये भिन्नमर्यादा भवन्ति किल सागराः।

सागरा भेदमिच्छन्ति प्रलयेऽपि न साधव।।

चाणक्य नीतीमधील या श्लोकात सांगितले आहे की, समुद्र स्वभावाने शांत मानला जातो. तो महापुराच्या किंवा भरतीच्या वेळी आपल्या मर्यादा विसरतो आणि सर्वकाही नष्ट करतो. काही माणसही अशाच पद्धतीने वागतात. पण, एक श्रेष्ठ व्यक्ती संकटाच्या काळातही आपल्या मर्यादांचे उल्लंघन करत नाही. अशा व्यक्तीला समुद्रापेक्षा श्रेष्ठ म्हटले जाते. याचे कारण असे की, जी व्यक्ती संकटाच्या काळात आपला संयम न गमावता शहाणपणाने सगळ्या गोष्टींना सामोरे जाते. तीच श्रेष्ठ असते.

प्रलये भिन्नमर्यादा भवन्ति किल सागराः।

सागरा भेदमिच्छन्ति प्रलयेऽपि न साधव।।

या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, जगात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला मिळेलच असे नाही. जसे प्रत्येक पर्वतावर सोने-चांदी किंवा रत्ने सापडत नाहीत, प्रत्येक हत्तीच्या डोक्यावर मोती नसतो, प्रत्येक जंगलात चंदनाची झाडे नसतात. तास प्रत्येक माणूस संतस्वभावाचा नसतो. म्हणून माणसाने आपल्याकडे जे आहे, जे मिळाले आहे आणि आपल्या क्षमतेनुसार जे मिळवता आले आहे, त्यात समाधानी राहायला शिकले पाहिजे. सतत इतरांकडे काय आहे याची तुलना करत राहिल्यास असमाधान वाढते. आपल्या क्षमतेपलीकडे किंवा मर्यादेपलीकडे काही मिळवण्याच्या नादात माणूस चुकीचे निर्णय घेऊ शकतो आणि मनःशांतीही गमावू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)