Chanakya Niti on Students, Kings and Friends : आचार्य चाणक्य एक महान विद्वान आणि शिक्षक होते. त्यांना त्यांचे गुरू चाणक यांच्याकडून चाणक्य हे नाव मिळाले. त्यांनी आपल्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितींचा सामना केला. पण, त्यांनी कधीही आपला संयम गमावला नाही. आचार्य चाणक्य हे मुत्सद्देगिरी, राजकारण आणि अर्थशास्त्र यांमध्ये पारंगत होते. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीतीमधील तत्त्वे मानवी जीवनाला खोलवर स्पर्श करतात. म्हणूनच चाणक्य नीतीशास्त्रातील तत्त्वे आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. नीतीशास्त्रामध्ये, आचार्य चाणक्य यांनी अशा काही परिस्थितींचे वर्णन केले आहे, ज्यात राजा, मित्र किंवा शिष्य नसणेच श्रेयस्कर असते. चला जाणून घेऊया त्या परिस्थिती कोणत्या आहेत.
मित्र
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक मित्र असतात. पण, त्यातील एखादा तरी चांगला मित्र असणे आवश्यक आहे. तुम्ही त्याच्याबरोबर कोणत्याही विषयावर मोकळेपणाने चर्चा करू शकतात. जर असा मित्र नसेल, तर मित्र नसलेलाच बरा. कारण चुकीच्या स्वभावाचा किंवा वाईट संगतीचा मित्र आयुष्यात अनेक समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे आयुष्यात मित्रांची संख्या कमी असली तरी चालेल; पण मित्र नेहमी चांगल्या स्वभावाचे आणि विश्वासू असावेत.
राजा
प्रत्येकजण राजा होण्याची आकांक्षा बाळगतो. एखाद्याला राजा होण्याची संधी मिळाली, तर ती निश्चितच अभिमानाची गोष्ट मानली जाते. मात्र, चाणक्य नीतीमध्ये काही परिस्थितींमध्ये राजा होण्यापेक्षा राजा न होणेच योग्य असल्याचे सांगितले आहे. कारण – आचार्य चाणक्य म्हणतात की, निरुपयोगी राज्याचा राजा होण्यापेक्षा अशा पदापासून दूर राहणेच अधिक योग्य आहे.
शिष्य
आचार्य चाणक्य म्हणतात की, शिष्य नसताना शिक्षक होण्यापेक्षा मूर्ख असणे बरे. याचा अर्थ असा की, एखाद्या मूर्ख व्यक्तीला ज्ञान दिले तरी तो स्वतःच्या चुकीच्या युक्तिवादांमुळे ते स्वीकारण्यास नकार देऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीला समजावून सांगण्यात आपला मौल्यवान वेळ वाया जाण्याची शक्यता असते.
पत्नी
एक धार्मिक स्त्री आपल्या पतीचा आणि कुटुंबाचा मान-सन्मान वाढवते आणि त्यांचे जीवन सुखी करते. तर एक वाईट पत्नी माणसाच्या जीवनातील सर्व सुख आणि मान-सन्मान नष्ट करते. म्हणूनच, आचार्य चाणक्य म्हणतात की वाईट पत्नी असण्यापेक्षा लग्न न करणे योग्य ठरेल.
