Chanakya Niti: पती-पत्नीमध्ये भांडणं होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे, नाही का? पण अनेक पुरुषांची तक्रार असते की त्यांच्या पत्नी अवाजवी मागण्या करतात, त्यामुळे सतत वाद होत राहतात. आचार्य चाणक्य यांनी सुखी आणि शांत कुटुंबासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. चाणक्य यांच्या मते, प्रत्येक वेळी पती-पत्नीच वादाचे कारण नसतात.
कधी-कधी पत्नी तिच्या मैत्रिणींच्या प्रभावाखालीही येऊ शकते. त्यामुळे पतीने पत्नी काही विशिष्ट प्रकारच्या मैत्रिणींपासून दूर राहील याची काळजी घ्यावी. कारण अशा मैत्रिणींमुळे वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. घरात विनाकारण वाद आणि तणाव टाळायचा असेल, तर पत्नीला अशा काही मैत्रिणींपासून हळूहळू दूर ठेवावे, असा त्यांचा सल्ला आहे. चला जाणून घेऊया, आचार्य चाणक्य यांनी पत्नीला कोणत्या लोकांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे…
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की, पतीने पत्नीला वाईट सवयी असलेल्या किंवा संशयास्पद स्वभावाच्या महिलांपासून दूर ठेवावे. अशा महिला कौटुंबिक मूल्यांचा आदर करत नाहीत आणि त्यांची मैत्री अनेक अडचणी निर्माण करू शकते. अशा महिला फक्त स्वतःच्या घराचा नाश करत नाहीत, तर तुमच्या घरातही वाद निर्माण करू शकतात.
दुसऱ्या प्रकारच्या महिला म्हणजे स्वतःच्या पैशाचा गर्व करणाऱ्या महिला. अशा महिलांना आपली श्रीमंती दाखवायला आणि इतरांना कमी लेखायला आवडते. त्यांच्याशी मैत्री केल्यास पत्नीच्या मनातही अवाजवी इच्छा निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे घरातील शांतता बिघडू शकते. त्यांच्याकडे पैसा असेल तर त्या तो दाखवू शकतात, पण तुमच्याकडे तितका पैसा नसेल तर ही गोष्ट हळूहळू वादाचे कारण बनू शकते.
चाणक्य यांनी नेहमी रागावणाऱ्या महिलांपासूनही दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा महिला छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करतात. त्यांच्या रागीट स्वभावाचा परिणाम तुमच्या पत्नीवरही होऊ शकतो, त्यामुळे घरातील आनंद आणि शांतता नष्ट होऊ शकते. अशा लोकांना ना घरात मान मिळतो, ना समाजात सन्मान मिळतो. पण ते तुमच्या घरावर वाईट परिणाम करू शकतात.
चाणक्य आपल्या नीतिशास्त्राच्या शेवटी म्हणतात की, मत्सर करणाऱ्या मित्र-मैत्रिणींपासून सावध राहा. अशा लोकांना तुमचं सुख किंवा यश पाहवत नाही. ते तुमच्यासमोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्याविरुद्ध कट रचतात. जर तुमची पत्नी अशा लोकांच्या जवळ असेल, तर तुमच्या घरातील खासगी गोष्टी बाहेर जाऊ शकतात आणि त्या माहितीचा वापर तुमचं नुकसान करण्यासाठी केला जाऊ शकतो. चाणक्य यांच्या या सल्ल्याचे पालन केल्यास कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होण्यापासून बचाव होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
