Bengaluru 3BHK Moving Cost : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरुमध्ये राहण्याचं आणि तिथल्या घरांच्या वाढत्या भाड्याचं गणित सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरलं आहे. कोलकाता ते बंगळुरु असा प्रवास करत एका नवविवाहित जोडप्याने जेव्हा दाक्षिणात्य बंगळुरुतल्या एका ३ BHK अपार्टमेंटमध्ये गृहप्रवेश केला, तेव्हा त्यांचा झालेला खर्च ऐकून सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. घर शोधण्यापासून ते थेट घरात पहिलं पाऊल ठेवण्यापर्यंत या जोडप्याला तब्बल अडीच लाख रुपयांचा फटका बसला आहे.

भाड्याच्या घराची महागडी सुरुवात (The Security Deposit)

अना मिश्रा आणि तिचा जोडीदार ईशान यांनी दाक्षिणात्य बंगळुरुच्या एका शांत आणि पॉश परिसरात घर भाड्याने शोधण्यास सुरुवात केली. अना आधीच बंगळुरुत राहत होती, तर ईशान कोलकात्याहून नवीन शहरात शिफ्ट होत होता. घर तर मिळालं, पण घराची चावी हातात येण्यापूर्वीच खिशाला मोठी कात्री लागली. घरमालकाने सिक्युरिटीज डिपॉझिट म्हणून थेट १.५ लाख रुपयांची मागणी केली. बंगळुरुच्या रेंट मार्केटमध्ये ही रक्कम सामान्य मानली जात असली, तरी एका झटक्यात एवढी मोठी रक्कम देणं सोपं नव्हतं.

दलाली आणि सामानाची लांब पल्ल्याची वाहतूक (Brokerage and Transportation)

घर शोधण्याचा त्रास वाचवण्यासाठी या जोडप्याने एका ब्रोकरची मदत घेतली होती. त्याबद्दल त्यांना एका महिन्याच्या भाड्याएवढी म्हणजे ३७ हजार रुपये ब्रोकरेज फी द्यावी लागली. खरी कसरत तर कोलकात्याहून फर्निचर आणि घरगुती सामान सुरक्षित आणण्यात होती. पॅकर्स अँड मुव्हर्सच्या मदतीने बेड, सोफा आणि डायनिंग टेबलसारखं मोठं सामान कोलकात्याहून बंगळुरुला आणण्यासाठी ६० हजार रुपये मोजावे लागले. सुदैवाने सामानाचं कोणतंही नुकसान न होता डिलिव्हरी झाली, हीच त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बाब ठरली. याशिवाय अनाच्या जुन्या घरातून नवीन घरात सामान आणण्यासाठी ३ हजार रुपये वेगळे खर्च झाले.

घरगुती उपकरणं आणि वाय-फायची जुळवाजुळव (Appliances and Wi-Fi Setup)

नवीन घरात लागणाऱ्या बेसिक गोष्टी विकत घेण्याऐवजी त्यांनी त्या रेंटवर घेण्याचा पर्याय निवडला. वॉशिंग मशीन, फ्रिज आणि वॉटर प्युरिफायर या तिन्ही गोष्टींसाठी ते दरमहा २,८०० रुपये भाडं देतात. तर जुनं वाय-फाय कनेक्शन नवीन पत्त्यावर शिफ्ट करण्यासाठी ७०० रुपयांचा खर्च आला.

एकूण गणित आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (The Final Tally and Social Media Reactions)

घराची सजावट आणि इतर खरेदी बाजूला ठेवूनही फक्त शिफ्टिंगचा एकूण खर्च तब्बल २,५३,५०० रुपयांवर पोहोचला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अडीच लाख खर्च करण्यापेक्षा एखाद्या घरात डाऊनपेमेंट करून स्वतःचं घर का घेतलं नाही, असा प्रश्न काही लोकांनी केला. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण बंगळुरुत ३ BHK घर फक्त ३७ हजारात मिळणं म्हणजे मोठी लॉटरी लागल्यासारखं आहे, असा दावा करत काहींनी या खर्चाचं समर्थनही केलं आहे.