Chanakya Niti On Wife : आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांपैकी एक होते. चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीती हा ग्रंथ सर्वात लोकप्रिय मानला जातो. त्यात त्यांनी मानवी आयुष्यातील अनेक बाजूंवर सखोल विचार करून त्यावर तोडगे दिले आहेत. तर या नीतीमध्ये, तुमच्या जोडीदारामध्ये काही असे गुण असतात जे तुम्हाला भाग्यवान बनवतात. यामध्ये कठीण परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभे राहणे, धर्मनिष्ठा, संयम आणि मधुर वाणी यांसारख्या गुणांचा समावेश असतो. हे गुण त्या जोडीदाराद्वारे तुमच्या घरात प्रवेश करतात आणि घर स्वर्गासारखे होते आणि तुमच्या जोडीदाराचे भाग्य उजळून निघते. चला, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…

भाग्यवान लोकांना अशी पत्नी मिळते…

१. “सा भार्या या शुचिर्दक्षा या पतिव्रता।
या पतिप्राणयित्वा या सत्यं पतिव्रता॥”

या श्लोकातून चाणक्य सांगतात की, तुमच्या जोडीदारामध्ये संयम, धर्मनिष्ठा आणि मधुर वाणी यांसारखे गुण असतील आणि जी सत्याची कधीही साथ सोडत नाही, तिचे वैवाहिक जीवन नेहमी आनंद, शांतीने भरलेले असते. त्यांना जोडीदाराचा पूर्ण पाठिंबाही मिळतो.

पृथ्वीवरच स्वर्ग

२. भोज्यं भोजनशक्तिश्च रतिशक्तिर्वराङ्गना ।
विभवो दानशक्तिश्च नाल्पस्य तपसः फलम् ।।

या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, आयुष्यात चांगले अन्न खायला मिळणे आणि ते खाण्याची ताकद असणे, सुंदर-समजूतदार जोडीदार मिळणे, पैसा-संपत्ती मिळणे, दुसऱ्यांना मदत किंवा दान करण्याची क्षमता असणे. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या नशिबात नसतात. हे सुख त्या लोकांना मिळते ज्यांनी मागील जन्मात चांगले कर्म, मेहनत आणि धर्म-पुण्य केलेले असते. त्यामुळे आयुष्य आनंदी आणि स्वर्गासारखे बनवण्यात चांगल्या जीवनसाथीचा मोठा वाटा असतो. समजूतदार आणि साथ देणारा पार्टनर असेल तर माणसाचे जीवन अधिक सुखी आणि शांत होते.

खरा मित्र कोण?

३. विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च।
व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च॥

चाणक्य नीतीचा हा श्लोक जीवनातील खऱ्या जोडीदाराच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. यामध्ये तीन मित्रांबद्दल माहिती देण्यात आली आहे.
एखाद्या रुग्णाचा सर्वात मोठा मित्र त्याचा औषध असते.
परदेशात किंवा घरापासून दूर प्रवास करताना. ज्ञान हे माणसाचा सर्वात मोठा मित्र असतो, कारण केवळ तुमचे ज्ञानच तुम्हाला मार्गदर्शन करू शकते.
त्याचप्रमाणे, घरी तुमची जोडीदार (पत्नी) ही तुमची सर्वात मोठी मैत्रीण असते, जी सुख-दुःखात तुमच्या पाठीशी उभी राहते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)