Chankya niti rules : चाणक्य नितीमध्ये आचार्य चाणक्यांनी जीवनाविषयी अनेक गहन अंतदृष्टी प्रकट केल्या आहेत. त्यांनी भारताचे सर्वश्रेष्ठ आर्थशास्त्र मुत्सद्दी आणि संत मानले जाते. त्यांची तत्वे आजही व्यक्तींना यश, संपत्ती, किर्ती आणि समृद्धीकडे मार्गदर्शन करतात. त्यांच्या ग्रंथात त्यांनी काही असा चिन्हांचाही उल्लेख केला आहे, जी सूचित करतात की व्यक्तीवर कठीण काळ किंवा संकट येणार आहे.

तुळस कोमजणे

तुळस कोमजणे हे धर्मग्रथांमध्ये अत्यंत गंभीरपणे घेतले जाणारे ेएक चिन्ह आहे. तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि घरात तिच्या उपस्थितीमुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. मात्र जर रोप कोणत्याही कारणाशिवा. कोमेजायला किंवा सुकायला लागले तर ते एक अत्यंत अशुभ चिन्ह मानले जाते. हे सुचित करते की घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे आणि आर्थिक समस्या वाढू शकतात. अशावेळी सावधगरी बाळगली पाहिजे आण धार्मिक किंवा सकारात्मक उपाययोजना केल्या पाहिजे.

वाद

दुसरे संकेत म्हणजे कौटुंबिक कलह म्हणजेच घरात वाढणारे संघर्ष, तणाव किंवा वाद. जर कुटुंबातील अशांतता किंवा कलह कोणत्याही ठोस कारणाशिवाय वाढू लागला तर ते कठीण काळ जवळ येत असल्याचे संकेत देते. यामुळे आर्थिक नुकसान, मानसिक ताण किंवा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत व्यक्तीनं शांत वृत्ती ठेवावी, घरात धार्मिर वातावरण निर्माण करावे आणि आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवावे.

फुटलेला आरसा

फुटलेला आरसा हे देखील एक चिसरे चिन्ह मानले जाते. चाणक्य नीतीनुसार, घरातील आरसा किंवा काच आपोआप फुटल्यास. ते आगामी दुर्दैव किंवा संकटाचे संकेत मानले जातात. हे एखाद्याच्या नशिबातील अडथळे किंवा अडचणी दर्शवते, असे मानले जाते. फुटलेली काच घरात ठेवू नये, कारण त्यामुळे गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.