काहीही विचारा, उत्तर तयार! ChatGpt सध्या याच गोष्टीसाठी प्रचंड चर्चेत आणि त्याच प्रमाणात लोकप्रियही होऊ लागलं आहे. आपल्याला हवी ती माहिती चॅटजीपीटीकडून मिळवता येऊ शकते, असे अनुभव सध्या अनेकजण शेअर करत आहेत. यासंदर्भात सोशल मीडियावर नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चर्चांमध्ये ChatGptचा हमखास उल्लेख केला जातो. चॅटजीपीटीचे रोज नवनवे ‘कारनामे’ समोर येत असताना आता ChatGptचा अजून एक ‘प्रेमळ’ कारनामा व्हायरल होत आहे. कारण आता त्यानं चक्क प्रेमपत्र लिहायला सुरुवात केली आहे!

प्रेमी युगुलांसाठी १४ फेब्रुवारी हा एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस मानला जातो. या दिवशी प्रेमी युगुलं मोठ्या प्रमाणावर आपल्या जोडीदाराकडे आपल्या भावना व्य्त करण्यासाठी माध्यमांचा शोध घेत असतात. बाजारात भेटवस्तूंची रेलचेल सहज लक्षात येते. भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स आणि अशा असंख्य गोष्टींचा त्यात समावेश असतो. पण या तयार वस्तू जरी बाजारातून आणल्या, तरी भावना चपखलपणे आणि अगदी योग्य पद्धतीने व्यक्त करणारे शब्द जुळवणं हा अनेक प्रेमींसाठी मोठा यक्षप्रश्न ठरतो. पण आता या समस्येवरही ChatGpt नं उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे!

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
ChatGpt Love letter viral
चॅटजीपीटीनं तयार केलेलं व्हायरल प्रेमपत्र! (फोटो – ट्विटर व्हायरल)

McAfee चा सर्व्हे आणि ChatGpt ची करामत!

McAfee या अँटिव्हायरस कंपनीनं नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेमध्ये चॅटजीपीटीची ही करामत नोंद झाली आहे. या कंपनीकडून सर्व्हेमध्ये जिवंत व्यक्तीने लिहिलेलं प्रेमपत्र आणि चॅटजीपीटीनं लिहिलेलं पत्र यातला फरक ओळखण्याचा प्रश्न लोकांना विचारला होता. विशेष म्हणजे तब्बल ७८ टक्के लोकांना यातला फरक अजिबात ओळखता आला नाही. या कंपनीकडून एकूण ९ देशांमधल्या ५ हजार व्यक्तींना सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आलं होतं. AI आणि इंटरनेट प्रेम आणि इतर नातेसंबंधांवर कसा परिणाम करतात, याचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं.

“तुम्ही कितीही क्रिएटिव्ह असला, तरी देखील ChatGpt…”; IIT Delhi च्या प्राध्यापकाचं विधान

६२ टक्के लोक प्रेमपत्रासाठी चॅटजीपीटीवर अवलंबून!

दरम्यान, या सर्वेक्षणातून समोर आलेली दुसरी रंजक माहिती म्हणजे सहभागी लोकांपैकी भारतातल्या एकूण ६२ टक्के लोकांनी येत्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या जोडीदाराला प्रेमपत्र लिहिण्यासाठी ChatGpt चा वापर करणार असल्याचं सांगितलंय. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

ChatGpt चं प्रेमपत्र व्हायरल!

चॅटजीपीटीनं लिहिलेलं एक प्रेमपत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेच पत्र सर्वेक्षणासाठी लोकांना दाखवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या पत्रामधील मजकूर वाचल्यास वाचणाऱ्याला ते एका मशीननं तयार केल्याचा थांगपत्ता लागण्याची शक्यता कमीच असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त केली जात आहे.