सध्याच्या डिजीटल जमान्यात अनेकजण ऑनलाईन काम करुन पैसे कमावतात, अनेक लोक या टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करतात. पण काही लोक ऑनलाईन काम देण्याच्या किंवा पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करतात. अशा सायबर क्राईमच्या बातम्या आपण याआधाही पाहिल्या आहेत. अशातच आता नोएडातील एका महिलेची घरबसल्या काम देण्याच्या नावाखाली तब्बल १२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. पीडित महिलेने सांगितलं की, तिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज आला. त्यात म्हटले होतं, “घरी बसून चित्रपटांचे रेटिंग द्या आणि पैसे कमवा, या मेसेजमुळे तिचे सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले.

‘लिंकवर ३० वेळा क्लिक करायला सांगितले’

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर ७४ मध्ये राहणाऱ्या महिलेने तिच्या तक्रारीत दावा केला आहे की, ५ जानेवारीला तिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज आला त्यात लिहिले होते की, ती घरी बसून पैसे कमवू शकते. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने तिला एक लिंक पाठवली आणि सांगितले की, चित्रपटांचे रेटींग करावे लागेल. शिवाय यावेळी या महिलेला १० हजार रुपये भरायला सांगितले आणि अधिक पैसे मिळविण्यासाठी लिंकवर ३० वेळा क्लिक करा असंही सांगितलं. त्यानंतर त्यांनी तिला एका ग्रुपमध्ये अॅड केलं ज्यामध्ये आधीच २५ लोक होते.

हेही वाचा- ‘यूपी का रोड बा…’ आमदार रस्त्याची पाहणी करायला गेले आणि बुटाबरोबर डांबरही उडाले, पाहा Viral Video

‘रेटिंगच्या नावाखाली १ लाख ४१ हजार ४१७ रुपये मागितले’

त्यानंतर महिलेला पुन्हा १० हजार रुपये देण्यास सांगितले. शिवाय ग्रुपमधील इतर लोक म्हणाले, ‘ही सामान्य गोष्ट आहे, तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील’. थोड्या वेळाने, त्या महिलेला ‘चांगले रेटिंग’ मिळाले आहे आणि बोनस मिळवण्यासाठी ४५ हजार ४४८ रुपये द्यावे लागतील असं सांगिण्यात आलं. दरम्यान, तासाभरानंतर पुन्हा चांगले रेटिंग देण्याच्या नावाखाली १ लाख ४१ हजार ४१७ रुपये भरण्यास सांगितले.

हेही वाचा- वडिलांचे ‘ते’ चार शब्द ऐकून ९ वर्षीय ‘इन्स्टा क्वीन’ ची आत्महत्या? पोलिसांना मात्र वेगळाच संशय, जाणून घ्या प्रकरण

महिलेने दावा केला आहे की, काही वेळाने समोरच्या लोकांनी मला माझी ठेव परत करण्यासाठी ४ लाख ११ हजार २४२ रुपये भरायला सांगितले, जर ते दिले नाही तर आधीचे पैसेही परत मिळणार नाहीत. त्यामुळे महिलेने ६ जानेवारीला पैसे भरले परंतु तिला परत काहीच मिळाले नाही. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीनंतर, माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) कायदा, २००८ च्या कलम 66D (संगणक संसाधनाचा वापर करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा) अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सायबर फसवणूक झाल्यास डायल करा १९३० –

जर कधी तुमच्यासोबत कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास, १९३० नंबरवर कॉल करा. या क्रमांकावर सायबर फसवणुकीची तक्रारीची नोंद घेतली जाते. या नंबरच्या मदतीने तुम्हाला सायबर फ्रॉडचे पैसेही मिळू शकतात. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सायबर क्राईमला बळी पडला असं वाटताच तुम्ही या नंबरशी संपर्क साधू शकता.