Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अमेरिकेतील एका चारचाकी गाडीच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) फोटो लावला आहे. अमेरिकेत राहणारे शिवप्रेमी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj photo on American vehicle) छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक तरुण मंडळी जगतात. महाराजांच्या विचारांवर चालतात. काही शिवप्रेमी गड किल्ल्यांना भेट देत महाराजांना मानवंदना देतात. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसून येतात. तुम्ही शिवप्रेमी हे महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पाहिले असतील पण तुम्हाला माहितीये का महाराजांचे चाहते हे जगभरात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अमेरिकत राहणाऱ्या महाराजांच्या एका चाहत्याने त्याच्या गाडीवर महाराजांचा फोटो लावला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावरून गाडी जाताना दिसेल. या गाडीच्या मागच्या काचेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्र किंवा भारतातील कोणत्याही राज्यातला नाही तर अमेरिकेतला आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, "अमेरिकेत पण दिसतात महाराज" हेही वाचा : Swiggy : भारीच! कॅटरर्स, हलवाई नव्हे, जोडप्यानं ऑनलाइन केलं जेवण ऑर्डर; साखरपुड्यात पाहुण्यांसाठी खास सोय; पाहा मजेशीर पोस्ट पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) हेही वाचा : “काहीही होऊ द्या, लॉलीपॉप खाणे महत्त्वाचे!” प्रार्थना सुरू असताना लॉलीपॉप खात होती चिमुकली, VIDEO पाहून पोट धरून हसाल ameriket_kolhapuri_tadka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "अमेरिकेत पण आपली मान ताठ होते जेव्हा महाराज दिसतात"या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "आपल्या महाराजांसारखा राजा या जगात दुसरा कोणी झाला नाही " तर एका युजरने लिहिलेय, "असं कुठलं गाव नाही तिथे माझ्या राजाचं नाव नाही ज्यांचा साज बघून स्वाभिमान जागा होतो त्यांनी लाईक करा" आणखी एका युजरने लिहिलेय, "अमेरिकेत काय साऱ्या जगात दिसेल माझा राजा…" एक युजर लिहितो, "शब्दही कमी पडतील पण खूप भारी वाटलं हा व्हिडिओ पाहून"