scorecardresearch

VIRAL VIDEO : ‘छोरी पटाता है’ च्या रिमिक्स व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्ही पाहिलाय का?

सध्या एका डायलॉगचा रिमिक्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘रसोदे में कौन था’ आणि ‘पावरी हो रहीं है’ यांसारखे ‘खाली छोरी पटाता है’ डायलॉगचे रिमिक्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. हा व्हिडीओ फारच मजेदार आहे.

Chhori-Patata-Hai
(Photo: Instagram/ mayurjumani)

सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हल्ली तर बरेच लोक इंटरनेटवर रिमिक्स व्हिडीओ बनवतात आणि शेअर सुद्धा करतात. असे व्हिडीओ शेअर करताच ते ताबडतोब व्हायरल होतात. अशा अनेक व्हिडीओंचा सोशल मीडियावर जणू खजिनाच सापडतो. सध्या असाच एक रिमिक्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘रसोदे में कौन था’ आणि ‘पावरी हो रहीं है’ यांसारखे ‘खाली छोरी पटाता है’ डायलॉगचे रिमिक्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

हा रिमिक्स व्हिडीओ संगीतकार आणि YouTuber मयूर जुमानी यांनी तयार केला आहे, जो इंटरनेटवर सध्या ट्रेंड करतोय. सोशल मीडिया यूजर्सला हा ३७ सेकंदाचा व्हायरल व्हिडीओ खूपच आवडला आहे. १ मार्च रोजी यूट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ८५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत.

या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मयूर जुमानी यांनी व्हिडीओमधील व्यक्तीने सांगितलेल्या ‘खाली छोरी पटाता’ या ओळीवर लक्ष केंद्रित केले आहे. आता या व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

आणखी वाचा : शेवटी आई ही आईच असते, हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही भावूक व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : नंदीने दूध प्यायल्याची बातमी पसरताच शिवालयात भाविकांची तुंबड गर्दी, …आणि जे घडलं ते पाहून हैराण व्हाल

हा व्हिडीओ देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातील आहे. लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लाइक करत आहेत आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

लोक या व्हिडीओला एवढ्या पसंती देत ​​आहेत की आत्तापर्यंत त्याला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “खूप छान, मला हसू आवरत नाही. तर दुसरीकडे आणखी एका युजरने या व्हिडीओचे वर्णन मास्टरपीस म्हणून केले आहे. या व्हिडीओमध्ये खाली छोरी पटाता है च्या पुढे ती व्यक्ती म्हणते, “घरात तांदूळ नाही, पीठ नाही, फक्त आपल्याच धुंदीत राहत असतो…” खरंच हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhori patata hai dialogue remix video goes viral on social media prp

ताज्या बातम्या