scorecardresearch

Viral Video: …आणि कोंबडी अंड्यांसोबत फुटबॉल खेळू लागली, नेटीझन्स म्हणाले ‘ही तर रोनाल्डोची जबरा फॅन’

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

chicken-funny-video
व्हायरल व्हिडीओ ( फोटो: @rupin1992/ Twitter)

चित्रपटांमध्ये तुम्ही एकापेक्षा एक नेत्रदीपक स्टंट पाहिले असतील. त्याचबरोबर सर्कस आणि जादूगाराचा खेळ तर तुम्ही पाहिलाच असेल, पण अशी स्टंटबाजी करताना कोंबडी क्वचितच पाहिली असेल. हे खरोखरच थक्क करणारे आहे. सध्या सोशल मीडियावर कोंबडीच्या स्टंटिंगचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत, व्हिडीओमध्ये कोंबडी अंड्यांसोबत विविध करतब दाखवत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर गोंधळलेले यूजर्स या कोंबडीला फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा जबरा फॅन म्हणत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कोंबडी अंड्यासोबत अनेक करतब दाखवत आहे. व्हिडीओमध्ये कोंबडी अंड्याजवळ उभी असल्याचे दिसत आहे. यानंतर कोंबडीने एखाद्या प्रोफेशनल फुटबॉलपटूप्रमाणे अंडे हवेत फेकले आणि पायावर ठेवले. यादरम्यान ती कधी एका पायावर तर कधी दुसऱ्या पायावर अंड्याला उडवत आहे. हा व्हिडीओ खरा आहे की एडिट केलेला आहे, या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, पण तरीही हा व्हिडीओ खूपच मनोरंजक आहे.

(हे ही वाचा: सुंदरबनमधील वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा Viral Video एकदा बघाच!)

(हे ही वाचा: Viral: आपल्या अंड्यासाठी थेट जेसीबीशी भिडला छोटा पक्षी, Video पाहून व्हाल भावूक)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. रुपिन शर्माने यांनी व्हिडीओसोबत कॅप्शनही लिहिले आहे, ‘#UEFA आणि #COPA रोज पाहिले जात आहे.’ हा मजेदार व्हिडीओ काही वेळात हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येने लोकांनी त्याला लाइक देखील केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chicken did funny act with egg video goes viral on social media ttg