Chicken Tikka Masala : चिकन टिक्का मसाला ही अनेक भारतीयांची आवडती डिश आहे. चिकन टिक्का (Chicken Tikka Masala ) मसाला हा पदार्थ भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. लंडन, न्यूयॉर्क या ठिकाणी असलेल्या रेस्तराँच्या मेन्यूमध्ये चिकन टिक्का मसाला या डिशला वेगळं स्थान मिळालं आहे. TasteAtlas या लोकप्रिय फूड रिव्ह्यू साईटने जगभरातल्या ५० सर्वोत्कृष्टी डिश कुठल्या त्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत चिकन टिक्का मसाला ही ब्रिटिश डिश असल्याचं म्हटलं आहे. ज्यानंतर भारतीयांनी कमेंट करत जोरदार टीका सुरु केली आहे. ब्रिटिशांची डिश म्हटल्यावर सगळेच भारतीय नेटकरी थेट भिडले आहेत. TasteAtlas च्या इन्स्टाग्राम पेजवर प्रतिक्रियांचा पाऊस TasteAtlas च्या इन्स्टाग्राम पेजवर चिकन टिक्का मसाला आणि त्यापुढे युनियन जॅक म्हणजेच ब्रिटिशांचा झेंडा दाखवल्याने भारतीय नेटकरी संतापले आहेत. एक युजर म्हणतो, "चिकन टिक्का मसाला ही भारतीय डिश आहे, ब्रिटिश नाही. तर एकाने चिकन टिक्का (Chicken Tikka Masala ) मसाला हे नाव तर बघा, ही डिश यु.के. मधून आलेली कशी असेल?, चिकन टिक्का मसाला जर यु.के. तून आला आहे तर मग कढाई चिकन कुठून आलंय?, आमच्या देशात जे व्हिगन आहेत त्यांनाही हे पटणार नाही" अशाही कमेंट काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तुम्ही आमचा कोहीनूर चोरलात, आता आमची डिशही (Chicken Tikka Masala ) चोरायची आहे का? असाही सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. अशा पद्धतीने भारतीय नेटकरी चांगलेच भिडले आहेत. हे पण वाचा- टिफिनमध्ये मांसाहारी पदार्थ घेऊन जाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात TasteAtlas ने केलेली पोस्ट काय आहे? TasteAtlas ने केलेल्या पोस्टमध्ये चिकनच्या ५० बेस्ट डिशेशची नावं आहेत. ज्यामध्ये बटर चिकन, टिक्का, चिकन 65, तंदुरी चिकन या चार डिश भारतीय दाखवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कुठल्या देशात चिकनचा कुठला प्रकार आहे त्यापुढे त्या त्या देशाचा झेंडा दाखवण्यात आला आहे. मात्र २१ व्या क्रमांकावर असलेल्या चिकन टिक्का (Chicken Tikka Masala ) मसाला या डिशपुढे इंग्लंडचा झेंडा दाखवला आहे. ज्यावरुन भारतीय नेटकरी प्रचंड संतापले आहेत. ब्रिटिशांनो कोहिनूर हिरा चोरलात आता आमची डिशही चोरायची आहे का? या प्रश्नापर्यंत भारतीय नेटकऱ्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. चिकन टिक्का मसाला ही कुठली डिश आहे? आहारतज्ञ कनिका मल्होत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार “भारतात चिकन टिक्का मसाला पहिल्यांदा दिसला. पारंपारिक भारतीय पाककृती म्हणजे डिशचे दोन मुख्य घटक, क्रीमी टोमॅटो सॉस आणि चिकन टिक्का, प्रथम दिसले. भारतीयांना चिकन टिक्का आवडतो, मॅरीनेट केलेला बोनलेस चिकन कबाब जो वारंवार तंदूर ओव्हनमध्ये शिजवला जातो. हे शक्य आहे की मलईदार टोमॅटो सॉस इतर करीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुलनात्मक भारतीय ग्रेव्हीतून बदलला गेला होता.” त्या पुढे म्हणतात, “चिकन टिक्का मसाला भारतात उगम पावला असला तरी, युनायटेड किंग्डममध्ये ही डिश सर्वप्रथम जगभरात प्रसिद्ध झाली. पण ही मूळ भारतीय डिश आहे. त्यांनी चवीनुसार त्यातल्या करी म्हणजेच रश्शामध्ये काही बदल केले."