Child And Baby Buffalo Video : लहान मुलं फार निरागस असतात. ते कधी काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे पालकांना सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून रहावं लागतं. सोशल मीडियावरही लहान मुलांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते पाहून नक्कीच आपल्याला हसू आवरत नाही, सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, जो पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. या व्हिडीओत लहान मुलीसह एका म्हशीचं रेडकू दिसतयं. ज्याबरोबर ती असं काही करते की पाहून लोकं पोट धरुन हसतायत. या
व्हिडीओत पाहू शकता, एक म्हशीचं रेडकू जमिनीवर आरामात झोपलेलं दिसतयं. यावेळी त्याच्या अगदी जवळचं एक चिमुकली बसून चक्क त्या रेडक्याचे दात घासतेय, चिमुकली जबरदस्ती रेडक्याचे तोंड पकडून आपल्या ब्रशने त्याचे तोंड घासतेय, यानंतर ब्रश काढून बघतेय, असे करताना रेडकू अचानक जीभ बाहेर काढते जी तिच्या हाताला लागते, त्यामुळे चिमुकली घाबरते आणि पळून जाते. या व्हिडीओतून लहान मुलं किती निष्पाप, निरागस असतात हे दिसते.
चिमुकलीचा हा व्हिडीओ @BaisaRakhi नावाच्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “किती गोंडस व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला, अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, “तुमच्या म्हशीबरोबर अन्याय होत आहे.” दुसऱ्या युझरने लिहिले की, “किती गोंडस बाळ आहे.” तिसऱ्या युझरने लिहिले की, “बाळाची तब्येत खूप चांगली आहे.” इतर अनेक युझर्सनीही मजेशीर कमेंट्स करत आहेत.
