आपण आपल्या आई-वडिलांकडून नेहमीच एक गोष्ट ऐकलेली आहे की, आगीशी कधीही खेळू नये. कारण- आग ही एक अशी गोष्ट आहे, जी अगदी मस्करी मस्करीत सगळ्याची जळून राख करू शकते. आगीशी खेळणे हे एक प्रकारे आपल्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. कारण- आगीची एक छोटीशी ठिणगीदेखील संपूर्ण जंगलाची राख करून सोडू शकते; परंतु काही लोकांना नेमके हेच समजत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आगीशी खेळताना दिसत आहे आणि शेवटी आगीने त्या मुलाला धडा शिकवलेला आहे. या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. आगीसोबत खेळल्याने काय होते याच्या प्रचितीचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून या व्हिडीओकडे पाहता येईल.

काही जणांना वेगवेगळ्या प्रकारचे साहसी स्टंट करण्याची सवय असते; पण ते स्टंट तज्ज्ञांकडून शिकून घेऊन, त्याच्या सातत्यपूर्ण सरावाने ते त्यात निष्णात झालेले असतात. असे असले तरी त्यांच्याकडूनही चूक होण्याची शक्यता असते आणि ती चूक जीवावरही बेतू शकते. त्यात आगीशी स्टंट करणे जीवघेणे ठरू शकते. बरेच जण अशा स्टंटमुळे जीव गमावून बसतात. त्यामुळे असे स्टंट करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असते. खबरदारी न घेतल्यास काय होऊ शकते, याचे प्रत्यंतर दाखविणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

(हे ही वाचा : Video: कंगाल पाकिस्तानात फिरायला गेली व्यक्ती, हॉटेलची खोली ११७ रुपयांत केली बुक, पण रूम पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही )

आगीशी खेळणे पडले महागात

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोकांचा जमाव दिसत आहे. गर्दीच्या मध्यभागी एक लहान मूल हातात टॉर्च घेऊन उभे असल्याचे दिसते. त्याच्या अवतीभवती बरेच जण त्याला पाहत उभे आहेत. मुलाने आगीच्या दिशेने तोंडातून पेट्रोल उडवून धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न केला; परंतु ती कृती पूर्ण करण्यापूर्वीच त्याच्या चेहऱ्याला आग लागली. त्यानंतर तेथील उपस्थितांनी ती आग विझवून, त्या बालकाला आगीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला हा धडा मिळेल की, आगीशी खेळणे प्राणांवर बेतू शकते.

व्हायरल व्हिडीओ येथे पहा

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर)वर @PalsSkit नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. अंगावर शहारे आणणारा हा अवघ्या नऊ सेकंदांचा व्हिडीओ मोठे शहाणपण शिकवून जातो. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी असे स्टंट जीवावर बेतू शकतात, असे म्हटलेय.