सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्याच्या देशभक्तीने आणि शिस्तीने अनेकांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण त्या मुलाचे कौतुक करत आहेत. अगदी लहान वयातही राष्ट्रगीताबद्दल असलेला आदर पाहून लोक भावूक होत असल्याचेही कमेंट्समध्ये दिसून येत आहे.

खेळताना अचानक ऐकू आले राष्ट्रगीत, चिमुकला जागेवरच स्तब्ध उभा (Child freezes mid-run as National Anthem begins)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला मैदानावर धावत असल्याचे दिसते. तो आपल्या खेळात इतका रमलेला असतो की त्याला आजूबाजूला काय चालले आहे याची फारशी पर्वा नसते. मात्र अचानक राष्ट्रगीत सुरू होताच संपूर्ण परिसरात शांतता पसरते. आजूबाजूचे सर्वजण राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ स्तब्ध उभे राहतात.

धावत असतानाच थांबला; राष्ट्रगीत संपेपर्यंत हललाही नाही (Stops instantly and stands still till the anthem ends)

दरम्यान, हा चिमुकलाही धावत असतानाच राष्ट्रगीताचा आवाज ऐकतो. विशेष म्हणजे तो क्षणाचाही विलंब न करता ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत स्तब्ध उभा राहतो. धावत असतानाच एका पाय पुढे आणि एक पाय मागे आणि हात धावण्याच्या स्थितीच ठेवतो. या अवस्थेत तो हालचाल न करता राष्ट्रगीत संपेपर्यंत उभाच राहतो. राष्ट्रगीताबद्दलचा त्याचा हा आदर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

राष्ट्रगीत पूर्ण होताच तो पुन्हा काहीच घडले नाही अशा सहजतेने धावत पुढे जातो आणि पुन्हा खेळात रमतो. हा संपूर्ण प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी मोबाईलमध्ये कैद केला असून तोच व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, चिमुकल्याच्या देशभक्तीचे कौतुक (Video goes viral, netizens praise the child’s patriotism)

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकजण त्याच्या संस्कारांचे आणि देशभक्तीचे कौतुक करत आहेत. लहान वयातही राष्ट्रगीताबद्दल असलेला आदर पाहून अनेकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘हाच खरा भारतीय नागरिक’, नेटकऱ्यांच्या भावूक प्रतिक्रिया (Netizens call him a true Indian citizen)

काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिले की, “लहानपणी देशावरचे निस्वार्थ प्रेम असेच असते, आम्हीही लहानपणी असेच होतो.” तर काहींनी “सलाम आहे त्या भावाला, हाच खरा देशभक्त” असे म्हणत त्या चिमुकल्याचे कौतुक केले. आणखी काहींनी “हाच खरा भारतीय नागरिक” अशा शब्दांत त्याच्या वागण्याचे समर्थन केले.

लहान वयात राष्ट्रगीताचा मान राखण्याचा सुंदर संदेश (A powerful message of respecting the national anthem)

सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र हा व्हिडीओ लोकांच्या मनाला भिडणारा ठरला आहे. लहान वयातही देशाबद्दलचा आदर आणि राष्ट्रगीताचा मान राखण्याचे संस्कार किती महत्त्वाचे असतात, याची आठवण हा व्हिडीओ करून देत असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे हा साधा पण अर्थपूर्ण क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.