scorecardresearch

लहान मुलापासून जीव वाचवण्यासाठीचे सापाचे सर्व प्रयत्न अयशस्वी; धक्कादायक Video Viral

मुलाला सापाची अजिबात भीती वाटत नाही, उलट हा साप मुलाला घाबरून स्वत:ला वाचवताना दिसत आहे.

child and snake
व्हायरल व्हिडीओ (फोटो: rasal_viper / Instagram )

विषारी सापांशी खेळण्याचा छंद आजकाल अनेकांच्या डोक्यात रुजत आहे. आजकाल असे भितीदायक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड झाले आहेत. मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मूल बिनधास्तपणे सापाशी खेळताना दिसत आहे, जणू ते त्याचे खेळणे आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत.सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारे धक्कादायक व्हिडीओ युजर्सची पहिली पसंती बनत आहेत. कदाचित यामुळेच कंटेंट क्रिएटर्स असे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. तुम्ही आतापर्यंत सापांना लोकांचे प्राण वाचवताना पाहिले असेल, पण या व्हिडीओमध्ये नेमके उलटे चित्र दिसत आहे.

व्हिडीओमध्ये एक लहान मूल सापाचे नाक दाबताना दिसत आहे. लहान मुलापासून स्वत:ला वाचवताना साप वेगाने धावताना दिसतो, पण त्याच्या मागे मुलगा पुन्हा जातोच. व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की, मुलाची पकड सैल होताच, साप वेगाने रेंगाळत पळून जाण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर मुलही त्याच्या मागे धावत असताना पुन्हा एकदा त्याला पकडते.

(हे ही वाचा: Viral Photo: घोडा नक्की कोणत्या दिशेने चालला आहे? तुम्ही देऊ शकता का योग्य उत्तर ?)

(हे ही वाचा: Viral Video: भूक लागल्यावर सिंहाने आपल्याच सिंहिणीची शिकार करण्याचा केला प्रयत्न!)

व्हिडीओमध्ये दिसणारा साप बराच मोठा आहे, मात्र असे असूनही मुलाला त्याची अजिबात भीती वाटत नाही, उलट हा साप मुलाला घाबरून स्वत:ला वाचवताना दिसत आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या व्हिडीओवर लाईक्स आणि व्ह्यूजची मालिका सुरूच आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Child was playing with snake shocking video viral ttg